शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मनपा : बाजार विभागाचे उत्पन्न तीन कोटींनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:51 IST

बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी महापालिका प्रशासनाने कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी मालमत्ता विभागासोबतच बाजार विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देआठ कोटींची वसुली : आर्थिक टंचाईत दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी महापालिका प्रशासनाने कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी मालमत्ता विभागासोबतच बाजार विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. बाजार विभागाचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन कोटींनी वाढले आहे.५ जानेवारी २०१९ पर्यंत बाजार विभागाचे उत्पन्न ४ कोटी ४० लाख होते. मात्र या वर्षात याच तारखेला ८ कोटींचा महसूल जमा झाला आहे. शहरातील बाजारपेठा, दुकाने, फेरीवाले आणि वाहनतळ यावर बाजार विभागाचे नियंत्रण आहे. त्यातून हा महसूल जमा करण्यात आला आहे.बाजाराच्या ठिकाणी पुरेशा सोयी उपलब्ध नाही. याचा उत्पन्नावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत विभागाच्या वसुलीत वाढ झाली आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे माध्यम असणाऱ्या विभागांपैकी बाजार विभाग महत्त्वाचा आहे. शहरात सीताबर्डी येथील महात्मा गांधी मार्के ट (सुपर मार्के ट ), नेताजी मार्के ट, गोकुळपेठ बाजार, गड्डीगोदाम मार्के ट, बुधवार बाजार, महालातील चिटणीस पार्क स्टेडियम, इतवारीतील दाजी कॉम्प्लेक्स, कमाल टॉकीज मार्के ट, जागनाथ बुधवारी मार्के ट, इतवारीतील पोहा ओळ, जुना मोटर स्टँड, दहीबाजार, धान्यगंज, मस्कासाथ शॉपिंग कॉम्प्लेक्स, सदर लिंक रोड, सदर डिस्पेन्सरी कॉम्प्लेक्स, कॉटन मार्के ट, संत्रा मार्के ट, महात्मा फुले बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्स, सदरमधील मंगळवारी बाजार आदी बाजारपेठा आणि दुकाने महापालिकेच्या मालकीची आहेत.रेल्वे स्टेशन परिसर, मेडिकल चौक, एस.टी. बसस्थानक, रेल्वे फिडर रोड इत्यादी ठिकाणी छोटे व्यवसाय करण्यासाठी तसेच दुकानदारांनी रस्त्यालगत अतिक्रमण करू नये यासाठी मनपाने दुकाने बांधून भाड्याने दिली आहेत. शहरात निरनिराळ्या भागात व्यवसाय करणारे फेरीवाले व विविध बाजारपेठांमध्ये महापालिकेने बांधून दिलेल्या ओट्यावर व उघड्या जागेवर व्यवसाय करणाऱ्यांकडून ठराविक किमतीत बाजार पासेसद्वारे (शुल्क चिठ्ठी) वसुली करून महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यात येते. परंतु या शुल्क वसुलीकडे दुर्लक्ष होत आहे. नागपुरात अधिकृत नोंदणी केलेले १६०० च्या जवळपास फेरीवाले, भाजीविक्रेत्यांची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र ही संख्या ४० हजारच्या घरात आहे. या सर्वांची नोंदणी झाल्यास वसुलीत वाढ होऊ शकते.

 

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका