शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनपा : विकास कामांच्या फाईल्स परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:47 IST

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच बांगर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या सर्व फाईल्स प्रशासनाकडून परत पाठविल्या जात आहेत. यामुळे प्रभागातील मूलभूत सुविधांची कामे बाधित होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीने मंजुरी दिली, पण प्रशासकीय मंजुरी नाही : प्रभागातील मूलभूत सुविधांची कामे बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रशासकीय मंजुरीसाठी फाईल्स पाठविल्या जातात. आयुक्तांच्या मंजुरीनंतर कार्यादेश दिले जातात. महिनाभरापूर्वी नगरसेवकांनी प्रभागातील विकास कामांच्या फाईल्स तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्या होत्या. मंजुरी मिळताच कामाला सुुरुवात केली जाणार होती. दरम्यान तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच बांगर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या सर्व फाईल्स प्रशासनाकडून परत पाठविल्या जात आहेत. यामुळे प्रभागातील मूलभूत सुविधांची कामे बाधित होण्याची शक्यता आहे.प्रभाग क्रमांक १७ मधील ४३ लाखांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांकडे फाईल पाठविण्यात आली होती. परंतु तीन आठवडे फाईल आयुक्तांकडे प्रलंबित होती. बांगर यांची बदली होताच प्रशासकीय मंजुरी न देता फाईल परत पाठविण्यात आली आहे. या प्रभागातील रस्ते नादुरुस्त आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. याचा विचार करता कार्यकारी अभियंता यांनी ही फाईल तयार केली होती.बांगर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या सर्वच फाईल्स परत केल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.१९०० व ५७२ अभिन्यास नासुप्रने महापालिकेला नागरी सुविधांची देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित केले. अशा अभिन्यासात रस्ते, गडरलाईन, नळाच्या दुरुस्तीची गरज आहे. त्यानुसार स्थायी समितीने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. आवश्यक असलेल्या विकास कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली, परंतु प्रशासकीय मंजुरी देण्याचे काम थांबविण्यात आले आहे. महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा पैसा विचारात घेऊन आवश्यकतेनुसार विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे धोरण नवीन आयुक्तांनी स्वीकारल्याने स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या शेकडो फाईल्स परत पाठविण्यात आल्या आहेत. याचे पडसाद महापालिकेच्या २० फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे.नगरसेवकांची धावपळ थांबलीप्रभागातील २५ ते ५० लाखापर्यंतच्या विकास कामांना स्थायी समितीची मंजुरी मिळताच, नगरसेवक स्वत: फाईल घेऊ न आयुक्तांकडे सहीसाठी जात होते. यासाठी नगरसेवकांची स्थायी समिती व आयुक्त कार्यालयात वर्दळ असायची. परंतु तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच नगरसेवकांची धावपळ थांबली आहे. आता हातात फाईल असलेले नगरसेवक शोधूनही सापडत नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका