शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  मनपाची आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम : आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:29 IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारपासून शहरातील प्रमुख रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देनवीन वर्षात शहरातील रस्ते आणि फूटपाथ मोकळे करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील प्रमुख रस्ते व बाजार भागातील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना फूटपावरून चालता येत नाही. अशा नागरिकांच्या तकारी आहेत. फूटपाथ मोकळे नसल्याने पादचारी रस्त्यावरून चालतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. अपघाताचा धोका वाढला आहे. महापौरांच्या ‘वॉक अ‍ॅन्ड टॉक विथ मेयर’ कार्यक्रम व जनता दरबारात फूटपाथवरील अतिक्रमण संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत फूटपाथ व प्रमुख रस्ते मोकळे करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले होते. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारपासून शहरातील प्रमुख रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.महापौरांच्या ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते, फूटपाथवरील अतिक्रमणाच्या समस्या मांडल्या जात होत्या. रस्त्यांवरील वाहनांचे पार्किंग, फूटपाथवरील दुकाने, हातठेले आदींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी महापौरांपुढे मांडण्यात आल्या होत्या.शहरातील वाढत्या अतिक्रमणासंदर्भात स्थायी निर्णय घेण्यासाठी महापौरांनी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होती. या समितीने अहवाल तयार केला आहे. यात अतिक्रमण हटविण्याची शिफारस केली असून हा अहवाल सभागृहात सादर केला जाणार आहे. तत्पूर्वीच अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे.पोलीस बंदोबस्तात कारवाईआयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील रस्ते तसेच फूटपाथ मोकळे करण्यासाठी बुधवारपासून कठोर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे, अतिक्रमणाच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. मोहीम दिवस-रात्र चालणार आहे. परंतु अतिक्रमण कारवाईला होणारा विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जाणार आहे.तातडीने फूटपाथ दुरुस्तीफूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच फूटपाथ ठिकठिकाणी नादुरुस्त आहेत. कुठे गट्टू निघाले असून कुठे काँक्रिट निघाले आहे. यामुळेही नागरिकांना फूटपाथवरून चालता येत नाही. याची दखल घेत महापौरांनी फूटपाथची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी ७ कोटींची तरतूद केली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण