शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाला १५० कोटींचा विशेष निधी खर्च करण्याचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:58 IST

राज्य सरकारच्या नगर विकास विभागातर्फे २२ आॅक्टोबरला विशेष अनुदान म्हणून १५० कोटींचा निधी जारी करण्यात आला. आहे. मात्र प्राप्त निधीच्या खर्चाच्या नियोजनाचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीला देण्यात आले होते. यामुळे महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. या निर्णयात सुधारणा करीत सोमवारी नगरविकास विभागाने हा संपूर्ण निधी खर्च करण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आर्थिक संकटातील महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी कंत्राटदारांना बिलाची थकबाकी व कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याची आशा आहे.

ठळक मुद्देशासनाचा सुधारित निर्णय : वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या नगर विकास विभागातर्फे २२ आॅक्टोबरला विशेष अनुदान म्हणून १५० कोटींचा निधी जारी करण्यात आला. आहे. मात्र प्राप्त निधीच्या खर्चाच्या नियोजनाचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीला देण्यात आले होते. यामुळे महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. या निर्णयात सुधारणा करीत सोमवारी नगरविकास विभागाने हा संपूर्ण निधी खर्च करण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आर्थिक संकटातील महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी कंत्राटदारांना बिलाची थकबाकी व कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याची आशा आहे.प्राप्त झालेला निधी खर्च करण्याचे अधिकार महापालिकेला मिळावा, यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा प्रयत्नशील होते. सोमवारी वीरेंद्र कुकरेजा व आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मुंबईत नगरविकास विभागाच्या सचिवांशी चर्चा के ली. त्यानंतर सुधारित निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच राज्यातील फक्त नागपूर शहराला अशा स्वरूपाचा निधी प्राप्त झाल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त आहे. त्याअनुषंगाने शहराच्या विशिष्ट गरजा भागविण्यासाठी सहायक अनुदानातून विशिष्ट कार्यक्रमाची आखणी करण्याचा, विविध कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा व त्याची अंमलबजावणी करण्याचा संपूर्ण अधिकार महापालिकेला देण्यात आला आहे.या निधीतून महापालिकेने त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार खर्च करावा, त्यानुसार स्थायी समितीच्या मान्यतेने कामे हाती घ्यावी. या निधीचा सुयोग्य कारणासाठी वापर करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची राहणार आहे. नागपूर महापालिकेला विशेष अनुदान देण्यासाठी विशिष्ट लेखाशीर्ष उपलब्ध नाही. त्यामुळे यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडून नगरविकास विभागाच्या मंजुरीने नियतव्ययातून महापालिकेला निधी वितरित केला जाणार आहे.सुधारित निर्णय प्राप्त होताच महापालिका प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. कंत्राटदारांच्या आंदोलनाची तीव्र्रता कमी होणार आहे. उपराजधानीच्या धर्तीवर शहराचा विकास व्हावा, यासाठी वर्ष १९९५-९६ सालापासून दरवर्षी १५ कोटींचे विशेष अनुदान देण्याला नगरविकास विभागाने गतकाळात मंजुरी दिली होती. परंतु कालांतराने विशेष अनुदान मिळाले नाही.५२.५७ कोटींचे जीएसटी अनुदानराज्य सरकारकडून महापालिकेला नोव्हेंबर महिन्याचे जीएसटी अनुदान म्हणून ५२.५७ कोटी जारी करण्यात आले आहे. या अनुदानात वाढ होईल,अशी अपेक्षा होती. मात्र त्यात वाढ झालेली नाही. असे असले तरी दिवाळीपूर्वी अनुदान प्राप्त झाल्याने तसेच १५० कोटींचे विशेष अनुदान खर्च करण्याचे अधिकार मिळाल्याने महापालिकेला बिकट आर्थिक स्थितीत मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी