शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्त, नासुप्र सभापती हाजीर हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:28 IST

महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास हे आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात टाळाटाळ करीत असल्याचे आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मनपा आयुक्त व नासुप्र सभापती यांना समन्स बजावला व गुरुवारी दुपारी २.३० वाजता आवश्यक स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास हे आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात टाळाटाळ करीत असल्याचे आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मनपा आयुक्त व नासुप्र सभापती यांना समन्स बजावला व गुरुवारी दुपारी २.३० वाजता आवश्यक स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले.यासंदर्भात न्यायालयात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका प्रलंबित असून त्यावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड.ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून अनधिकृत धार्मिकस्थळांविषयी आवश्यक माहिती दिली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्याबाबत ५ मे २०११ रोजी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यांतर्गत अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा, महापालिका व राज्यस्तरावर वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. २९ सप्टेंबर २००९ नंतर बांधण्यात आलेली अनधिकृत धार्मिकस्थळे महापालिका व जिल्हा प्रशासन यांनी तातडीने तोडणे आवश्यक आहे. केवळ १ मे १९६० पूर्वी बांधण्यात आलेली ‘ब’ गटातील धार्मिकस्थळे पाडण्यासाठी राज्यस्तरीय समितीची परवानगी घ्यावी लागते. नागपूर महापालिका क्षेत्रात १ मे १९६० पूर्वी बांधण्यात आलेली ‘ब’गटामधील ११५ धार्मिकस्थळे पाडण्याची परवानगी मिळण्यासाठी २१ एप्रिल २०१८ रोजी राज्यस्तरीय समितीला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर तातडीने आवश्यक निर्णय घेण्यात येईल, असे जैन यांनी न्यायालयाला सांगितले. महापालिकेने अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर करून कारवाईची माहिती दिली. परंतु, मनपा व नासुप्रच्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नाही. त्यामुळे मनपा आयुक्त व नासुप्र सभापती यांना समन्स बजावण्यात आला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.अशी आहेत अनधिकृत धार्मिकस्थळेमुख्य सचिवांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, नागपूर महापालिका क्षेत्रात २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची १५२१ अनधिकृत धार्मिकस्थळे होती. सर्वेक्षणानंतर यापैकी १८ धार्मिकस्थळांना ‘अ’ गटात तर, १५०३ धार्मिकस्थळांना ‘ब’ गटात टाकण्यात आले. ‘अ’ गटातील धार्मिकस्थळे नियमित केली जाणार आहेत. परंतु, आतापर्यंत ‘ब’ गटातील केवळ ५४ धार्मिकस्थळे तोडण्यात आली आहेत. २९ सप्टेंबर २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिकस्थळे असून त्यापैकी ५१ धार्मिकस्थळे आतापर्यंत तोडण्यात आली आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे