शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे लांबणार मनपाचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:13 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. याचा विकास कामांना मंजुरी देण्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता विचारात घेता २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुका संपताच सादर क रण्याचे संकेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देएलबीटी अनुदान वाढल्याने दिलासा : मालमत्ता कराच्या वसुलीतही वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाणार आहे. याचा विकास कामांना मंजुरी देण्यावर परिणाम होणार असल्याची शक्यता विचारात घेता २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुका संपताच सादर क रण्याचे संकेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी दिले आहेत.विधानसभा निवडणुका विचारात घेता विकास कामांना वेळीच मंजुरी घ्यावी लागणार आहे. निवडणुकीपूर्वी विविध विकास कामांचे भूमिपूजन करावयाचे असल्याने मे महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या दृष्टीने स्थायी समिती नियोजन करणार आहे.स्थायी समितीने २०१८-१९ या वर्षाचा २,९४६ कोटींचा जम्बो अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र ३१ मार्च २०१९ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता आयुक्तांनी २,२७७.०६ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला. स्थायी समितीला अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ६६९ कोटींची कपात केली. राज्य शासनाने एलबीटी अनुदानात वाढ केली असल्याने पुढील वर्षात १०५० कोटींचे अनुदान प्राप्त होणार आहे. तसेच मालमत्ता करापासून ४०० कोटी उत्पन्न होईल. यामुळे बिकट आर्थिक स्थितीत महापालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील वर्षात महापालिकेला आवश्यक खर्चाची फारशी चिंता राहणार नाही. मात्र विकास कामांसाठी उत्पन्न वाढीवर भर द्यावा लागेल.गेल्या वषींच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. एलबीटी अनुदानातील वाढ व टॅक्समधील वाढ गृहीत धरता पुढील वर्षाचा अर्थसंकल्प तीन हजार कोटींच्या पुढे जाणार आहे. असे असले तरी पुढील काही महिने आधीच्या स्थायी समितीने मंजुरी दिलेले परंतु अद्याप कार्यादेश न झालेल्या कामांना मंजुरी द्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन कामांना अर्थसंकल्पानंतरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ२०१८-१९ या वर्षात मालमत्ता करापासून २५० कोटींचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने पुढील वर्षात कोणत्याही स्वरुपाची करवाढ प्रस्तावित नसली तरी नवीन मालमत्ता कराच्या कक्षेत येणार असल्याने मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील ४०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प