शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मुंढे साहेब, ‘व्हॉट इज युवर प्रॉब्लेम’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:09 IST

आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आधी परवानगी नाकारतात, नंतर तेच परवानगी देतात. निगम सचिवांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानतंरच २०जूनच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. त्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून महापौर कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना संसर्गाचा विचार करता ही सभा घेणे योग्य होणार नाही, असे सांगितले जाते. शासनाच्या दिशानिर्देशानुसार आयोजित सभेलाही विरोध केला जातोय, आयुक्त मुंढे साहेब, ‘व्हॉट इज युवर प्राब्लेम’अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेबाबत मंगळवारी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देमहापौर संदीप जोशी यांचा संतप्त सवाल : सभागृह घेण्याचा अधिकार महापौरांंचा; सभा होणारच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आधी परवानगी नाकारतात, नंतर तेच परवानगी देतात. निगम सचिवांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानतंरच २०जूनच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. त्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून महापौर कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना संसर्गाचा विचार करता ही सभा घेणे योग्य होणार नाही, असे सांगितले जाते. शासनाच्या दिशानिर्देशानुसार आयोजित सभेलाही विरोध केला जातोय, आयुक्त मुंढे साहेब, ‘व्हॉट इज युवर प्राब्लेम’अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेबाबत मंगळवारी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.पदाधिकारी व प्रशासन ही दोन चाके आहेत. समन्वयाशिवाय शहराचा विकास शक्य नाही. विकासाचा विचार करता शक्यतो आम्ही संघर्षाची भूमिका टाळत आहोत. पण पूर्वग्रहदूषित ठेवून आयुक्त आलेत. महापालिकेत सभागृह हे सर्वोच्च असून स्थायी समिती, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त असा प्रोटोकॉल आहे. पण स्थायी समिती अध्यक्षांच्या ओएसडीची बदली करताना पदधिकाऱ्यांना साधी कल्पनाही नाही. यापूर्वी मनपात असे कधी घडले नाही. कुठल्याही महापालिकेत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती माहिती महापौरांना दिली जाते. पण मुंढे साहेब कोणत्याही पदाधिकाऱ्यांना काहीच सांगत नसल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला.स्थायी समितीची ५ मे रोजी बैठक झाली. १५ मे रोजी होणारी बैठक घेऊ नका, असे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर १ जूनला पत्र दिले, बैठक घ्या. वास्तविक शासनाच्या ३ जूनच्या परिपत्रकात सभा, बैठका घेण्याला कुठलेही निर्बंध घातलेले नाहीत. २० जूनला सुरेश भट सभागृहात होणारी सभा फिजिकल डिस्टन्स ठेवूनच घेतली जाणार आहे. असे असूनही आयुक्तांनी सभा न घेण्याचा सल्ला दिला असल्याचे जोशी म्हणाले.२० जूनची सभा होणारचशासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करूनच २० जूनला महापालिकेची सर्वसाधारण सभा घेतली जाणार आहे. गंभीर स्थिती असूनही पुणे महापालिकेची १७ जूनला सभा होत आहे. नाशिक व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या सभा झाल्या आहेत. सभागृह घेण्याचा महापौरांचा अधिकार आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता सभा होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. सभेला परवानगी नाकारलीच तर सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत पुढील निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.नगरसेवक हवालदिलदोन दिवसाच्या पावसात शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले. पाणी घरात शिरल्याने नागरिक नगरसेवकांना जाब विचारतात. नाल्या, चेंबर दुरुस्तीच्या लाख-दोन लाखांच्या फाईल प्रलंबित आहेत. अत्यावश्यक कामांसाठी निधी दिला जात नाही, असे जोशी यांनी सांगितले.३०० लोकांना मार्गदर्शन कसे केले?आयुक्त म्हणतात, मी कायद्यानुसार काम करतो. मनपाच्या बैठका, सभा घेऊ नका असा सल्ला देतात. मात्र आयुक्तांनी स्वत: ३१ मे रोजी रजवाडा पॅलेस येथे ३०० लोकांना मार्गदर्शन कसे केले? स्वत: नियम पाळत नाहीत. दुसऱ्यांना नियम सांगतात, असा आरोप जोशी यांनी केला.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका