शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

मुंढे यांचा वित्त विभागातील चौघांना दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 22:34 IST

बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लेखा व वित्त विभागाला आकस्मिक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यात अनियमितता निदर्शनास आल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देनोटीस बजावण्याचे निर्देश : जीपीएफ व पेन्शन योजनेत अनियमितता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमानुसार कामे करा, कामाप्रति प्रामाणिक असणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही. पण अनियमितता खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला होता. याचा प्रत्यय महापालिकेच्या लेखा व वित्त विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला. बुधवारी मुंढे यांनी या विभागाला आकस्मिक भेट देऊ न कामकाजाची माहिती घेतली. यात अनियमितता निदर्शनास आल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.वित्त विभागातील लेखा अधिकारी प्रतिभा श्रेया, जीपीएफ विभागातील पौर्णिमा पाठक, अंशदायी पेन्शन योजना विभागातील नरेश बोकडे व वहीद शेख आदींना कारणे द्या, नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कामकाजात अनियमितता निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.लेखा अधिकारी, निगम लेखा परीक्षक, सेवा निवृत्ती शाखा, भविष्य निर्वाह निधी शाखा, नियंत्रण द्वि नोंद लेखांक पद्धती अशी पदे मंजूर आहेत. या विभागातील पदावर अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात पात्रता नसतानाही काही जणांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातील डी.डी. डहाके यांची अकारण समिती विभागात बदली करण्यात आली आहे. तर रवींद्र भारती यांच्याकडे सोयीनुसार सहायक अधीक्षक पदाचा पदभार देण्यात आल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे, जीपीएफ पावत्यांचा घोळ, सिटीझन चार्टरमधील अनियमितता यामुळे मुंढे यांनी नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास आयुक्तांनी लेखा व वित्त विभागाला भेट दिली. लेखा व वित्त अधिकारी अनंता मडावी यांनी यांच्याकडून माहिती जाणून घेतली.बैठकीला जाण्याची परवानगी घ्याअधिकाऱ्यांनी बैठकीला जाण्यापूर्वी आयुक्त कार्यालयाला सूचित करून परवानगी निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे महापालिकेत लहानसहान कामासाठी आयोजित होणाऱ्या बैठकांना आळा बसणार आहे. परंतु आयुक्तांच्या आदेशाचे पालन न केल्यास काही पदाधिकारी नाराज होतील, अशी भीती असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका