लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईतील एका गुन्हेगाराला पाचपावली पोलिसांनी अटक केली.शब्बीर इक्बाल शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव असून तो गवंडी शिवाजीनगर, म्हाडा कॉलनी येथील रहिवासी होय.आरोपी शब्बीर याने ३१ मे रोजी त्याची पत्नी आयेशा शेख (वय २५) हिच्यासोबत घरगुती वाद झाल्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आयेशाच्या तक्रारीवरून नवी मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी शब्बीर मुंबईतून पळून गेला. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी ठिकठिकाणच्या पोलिसांना माहिती कळविली. दरम्यान, शुक्रवारी पाचपावली पोलिसांचे पथक गस्त करीत असताना त्यांना लष्करीबाग परिसरात आरोपी शब्बीर राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.शब्बीरला अटक केल्यानंतर पाचपावली पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे मुंबई येथे संपर्क साधून आरोपीबाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांचे पथक आज नागपुरात पोहोचले आणि शब्बीरला ताब्यात घेतले. ही कारवाई पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे, पोलीस निरीक्षक महेश धवाण, सहायक निरीक्षक सूरज सुरोशे, हवालदार रामेश्वर कोहळे, अभय साखरे, शैलेंद्र चौधरी, शिपाई नितीन धकाते आणि सुमित बावनकर यांनी केली.
मुंबईचा गुन्हेगार नागपुरात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:36 IST
पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईतील एका गुन्हेगाराला पाचपावली पोलिसांनी अटक केली. शब्बीर इक्बाल शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव असून तो गवंडी शिवाजीनगर, म्हाडा कॉलनी येथील रहिवासी होय.
मुंबईचा गुन्हेगार नागपुरात जेरबंद
ठळक मुद्देपाचपावलीत दडून बसला होता : मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले