शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  महाठग रमण सवाईथूलच्या पोलिसांनी बांधल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन खरेदीच्या नावाने बँकेतून लाखोंचे कर्ज काढून त्या वाहनांची नंतर परस्पर विक्री करणारा महाठग रमण ऊर्फ रमणकुमार मधुकर सवाईथूल (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने मुसक्या बांधल्या.महाठग रमण सवाईथूलविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. तो बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये वेगवेगळ्या नावाने खाते ...

ठळक मुद्देअनेक बँकांना गंडालाखोंची रक्कम हडपलीआर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन खरेदीच्या नावाने बँकेतून लाखोंचे कर्ज काढून त्या वाहनांची नंतर परस्पर विक्री करणारा महाठग रमण ऊर्फ रमणकुमार मधुकर सवाईथूल (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने मुसक्या बांधल्या.महाठग रमण सवाईथूलविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. तो बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये वेगवेगळ्या नावाने खाते उघडतो. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी तेथून तो कर्ज उचलतो आणि नंतर बेपत्ता होतो. सवाईथूल याने विदर्भ कोकण ग्रामीण बँक नागपूर दत्तवाडी शाखेत २०१४ मध्ये डस्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरण सादर केले होते. कर्ज जलदगतीने मिळावे म्हणून स्वत:च्या नावे अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्याचा बनावट उताराही त्याने बनावट कोटेशनसह बँकेत सादर केला होता. बँकेने त्याला १० लाखांचे कर्ज मंजूर केल्यानंतर त्याने एमएच ४०/ एसी ६८४९ क्रमांकाची डस्टर २५ मे २०१४ ला खरेदी केली. ती विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत तारण ठेवली. त्यानंतर त्याने या वाहनाच्या नावाने बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार करून प्रादेशिक परिवहन कार्यालयात तशी नोंदणी करीत ही डस्टर तुषार घागरे यांना विकली. बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने वसुली पथकाने चौकशी केली तेव्हा ही बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे बँक अधिकाऱ्याने वाडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.अशाच प्रकारे २४ फेब्रुवारी २०१२ ला रमण मधुकर सवाईथूल, दर्शन वामन जाधव (रा. श्यामनगर, मनीष नगर)आणि दत्तात्रय सदाशिवराव गायकवाड (रा. वानाडोंगरी) या तिघांनी नागपूर नागरिक सहकारी बॅक लि. च्या मनीषनगर शाखेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ लाख, ५० हजारांचे वाहनकर्ज उचलले. वाहन खरेदी न करता परस्पर स्वत:च्या बँक खात्यात ही रक्कम वळती करून घेतली. या प्रकरणात बँक अधिकारी आनंद दत्तात्रय जगदाळे यांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू होता. या गुन्ह्यात आरोपी रमण सवाईथूलने अटकपूर्व जामीन मिळवण्याचेही प्रयत्न केले होते. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता.तेव्हापासून महाठग रमण पोलिसांसोबत लपाछपी खेळत होता. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, शहआयुक्त शिवाजीराव बोडखे, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी महाठग रमणच्या मुसक्या बांधण्यासाठी त्याच्या संपर्कातील व्यक्तींवर नजर रोखण्याचे आदेश दिले होते. तो १८ मे च्या मध्यरात्री प्रतापनगरातील भांगे लॉनजवळ येणार असल्याची माहिती मिळताच उपायुक्त श्वेता खेडकर यांनी आपल्या सहकाºयांमार्फत त्या भागात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे रात्री ११.२५ वाजता तो लॉनजवळ येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा १२ दिवसांचा पीसीआर मिळवला.सहा गुन्ह्यांची कबुलीमहाठग सवाईथूलने विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी सहा बँकांच्या फसवणुकीची कबुली दिली आहे. त्याने ही रक्कम कुठे लपविली, त्याचे साथीदार कुठे दडले आहेत, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. वाडीतील दुसºया गुन्ह्याची कस्टडी संपल्यानंतर त्याला बेलतरोडीतील गुन्ह्यात अटक केली जाण्याचे संकेत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एस. बी. नरके महाठग सवाईथूलची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटकfraudधोकेबाजी