शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एमटीडीसीतर्फे ‘पर्यटन दिना’ची तयारी

By admin | Updated: September 26, 2014 01:15 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात एमटीडीसीसोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर

महाविद्यालयांचा सहभाग : विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन नागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात एमटीडीसीसोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातील पर्यटन विभाग, एलएडी महाविद्यालय, तुली कॉलेज, तिरपुडे कॉलेज व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पर्यटन विभागाचा सक्रिय सहभाग राहणार असल्याची माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक वरिष्ठ महाव्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स येथील एमटीडीसीचे पर्यटन निवास येथे कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला अलायन्स इन्फोस्पेस अकॅडमीचे संचालक जयदीप दास, वेदचे माजी अध्यक्ष विलास काळे व हनुमंत हेडे प्रामुख्याने उपस्थित राहतील. दरम्यान जयदीप दास ‘जबाबदार पर्यटन आणि समूह विकासात सहभाग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विलास काळे ‘पर्यटन आणि समूह विकास’ या संकल्पनेवर बोलतील. या कार्यक्रमात सुमारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून, त्यांसाठी ‘पर्यटन आणि समूह विकास’ या विषयावर छायाचित्र आणि सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पुरस्कार प्रदान करून, त्यांचा गौरव केला जाईल. असेही हेडे म्हणाले. दुसरीकडे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून एमटीडीसीच्यावतीने २७ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी विदर्भातील ताडोबा, चिखलदरा, मेळघाट, नागझिरा व पेंच सिल्लारी येथे जाण्या-येण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे हेडे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पर्यटन विभागाच्या प्रमुख लक्ष्मी रमण, एलएडी कॉलेच्या जोत्स्ना पाटील व चारुलता गजभिये उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)