शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण : नागपूर जिल्ह्यातील ११ लाख वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:21 IST

महावितरणकडून वीज ग्राहकांना मोबाईल एसएसएस सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याने नागपूर जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहक याचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील सुमारे २ लाख वीज ग्राहकांनी अद्यापही महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी न केल्याने ते यापासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देशिल्लक वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदवावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणकडून वीज ग्राहकांना मोबाईल एसएसएस सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याने नागपूर जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहक याचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील सुमारे २ लाख वीज ग्राहकांनी अद्यापही महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी न केल्याने ते यापासून वंचित राहिले आहेत. परिणामी महावितरणकडून दिले जाणारे संदेश या वीज ग्राहकापर्यंत पोहचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या वीज ग्राहकांनी आपली माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात ७ लाख ८१ हजार ५९१ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची माहिती महावितरणकडे दिली असून नागपूर ग्रामीण भागात ३ लाख ६६ हजार ६ ग्राहकांनी आपले मोबाइलला क्रमांक महावितरणला दिले आहेत.महावितरणकडे वीज ग्राहकाचा मोबाईल क्रमांक नोंदणी असल्यास अकस्मात वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचे कारण, वीज ग्राहकाच्या घरी मीटर वाचन करण्यास मीटर रीडर कधी आणि किती वाजता येणार याची माहिती, वीज ग्राहकाने विशिष्ट कालावधीत किती युनिटचा वापर केला, किती रुपयांचे देयक भरले आहे याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून वीज ग्राहकास दिल्या जाते. वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक, आधार कार्ड नंबर आणि ई-मेल नोंदणीसाठीttps://consumerinfo.mahadiscom.in येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वीज ग्राहकांनी आपला वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या १८००२३३३४३५ येथे ,तसेच राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १९१२ येथे संपर्क साधावा. वरील सर्व क्रमांक टोल फ्री असल्याने यासाठी वीज ग्राहकाला पैसे मोजावे लागत नाहीत. सोबतच महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी नुकतीच ‘मिस्ड कॉल’ सेवा सु्न६ करण्यात आली आहे. महावितरणकडे नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावरून वीज ग्राहकाने ०२२- ४१०७८५०० येथे फोन करायचा आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsmsएसएमएस