शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

महावितरणकडून युद्धपातळीवर वीज पुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:15 AM

मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक खोलगट भागात पावसाचे पाणी जमा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. पावसाचा जोर कमी होताच वीज वाहिनी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. ग्रामीण भागातील खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरूकरण्यात आला.

ठळक मुद्देवीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक खोलगट भागात पावसाचे पाणी जमा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. पावसाचा जोर कमी होताच वीज वाहिनी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. ग्रामीण भागातील खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरूकरण्यात आला.पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील खोलगट भागात पाणी जमा होऊ लागले. मोठ्या इमारतीतील तळ मजल्यावर वीज मीटर असलेल्या वीज ग्राहकांचे महावितरण कार्यालयात माहितीसाठी आणि वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यासाठी दूरध्वनी येऊ लागले. भर पावसात महावितरणचे जनमित्र आपले कर्तव्य बजावत होते. मॉरिस कॉलेज टी जवळील भोंडा मंदिराजवळ जुने झाड उन्मळून पडल्याने टेकडी लाईन आणि महाजन मार्केट परिसरास वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीचा पुरवठा दुपारी १ वाजता काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. कुही तालुक्यातील मळणी गावातील नाला पुराच्या पाण्यामुळे वाहू लागला यामुळे ३३/११ के. व्ही. डोंगरगाव उपकेंद्राकडे जाणारा मार्ग बंद झाला. परिणामी पुराचे पाणी ओसरल्यावर डोंगरगाव उपकेंद्रात जाऊन येथील बिघाड दुरुस्त करण्यात आला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेसा बेलतरोडी उपकेंद्रात पाणी जमा झाले होते. सीताबर्डी,सेंट्रल बाजार रोड रामदासपेठ, काँग्रेस नगर, शंकरनगर, अमरावती रोड, अजनी चौक, रामदासपेठ, धरमपेठ परिसरातील अनेक इमारतीमधील तळ मजल्यावर पाणी पावसाचे पाणी शिरल्याने येथील वीज ग्राहकांनी वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यासाठी महावितरणच्या शाखा कार्यालयात फोन करून विनंती केली. नागपूर शहरातील वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती वीज ग्राहकांना दुपारी १२ नंतर एसएमएसच्या माध्यमातून देण्यात आली. यात मुसळधार पावसामुळे आपला वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला असून पुराचे पाणी ओसरताच वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे यात नमूद करण्यात आले होते.हिंगणा परिसरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुराचे पाणी वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महाजनवाडी आणि हिंगणा परिसरातील काही भागाचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. त्रिमूर्तीनगर उपकेंद्रात पावसाचा जोर ओसरल्यावर पाहणी केली असता या उपकेंद्राला वीज पुरवठा करणाºया वीज वाहिनीत बिघाड झाल्याने या परिसरातील सुमारे ५ हजार वीज ग्राहकांचा पुरवठा बराच काळ बंद राहिला. सावनेर आणि पाटणसावंगी परिसरास वीज पुरवठा करणाºया महापारेषणच्या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने येथील सुमारे ८ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा दुपारी २ वाजता बंद झाला. कळमेश्वर-धापेवाडा,गोंडखैरी वाहिनीवर वीज पडल्याने येथील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरु करण्यात आले . मौदा तालुक्यातील शिवानी आणि निंबा या गावात नागनदीच्या पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याने येथील वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी ३ वाजता बंद करण्यात आला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य अजुनही सुरुच आहे, तेव्हा वीज ग्राहकांनी संयम ठेऊन महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज