शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

अनुदानाच्या व्याजातून महावितरणची कमाई

By admin | Updated: December 27, 2014 02:58 IST

महाराष्ट्रातील उद्योगजगत संकटात आहे. वीज बिलात सूट देण्यासाठी ३९७ कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा सरकारने केली.

कमल शर्मा नागपूर महाराष्ट्रातील उद्योगजगत संकटात आहे. वीज बिलात सूट देण्यासाठी ३९७ कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा सरकारने केली. परंतु उद्योगांना २० टक्के वाढीव वीज बिल प्राप्त झाल्याने त्यांच्या आनंदावरच विरजण पडले आहे. सरकारने जी.आर. काढण्यात उशीर केल्याचे कारण सांगून महावितरणने आपले हात झटकले आहे. सोबतच पुढच्या बिलात अ‍ॅडजस्ट करण्यात येईल, असे आश्वासन देऊन उद्योगांची समजूत काढण्यात आली आहे. परंतु ३९७ कोटी रुपयांचे व्याज मात्र महावितरणाच्या खिशात आजच जमा झाले. गेल्यावर्षी वीज बिलदरात २० टक्के वाढ करण्यात आली होती. याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडू नये म्हणून महावितरणला दर महिन्याला ७०६ कोटी रुपयाची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला. परंतु आॅगस्टनंतर राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ही सबसिडी बंद करण्यात आली. राज्यातील नवीन भाजपा-शिवसेना सरकारने या सबसिडीची जबाबदारी आॅक्टोबरपर्यंत घेतली. राज्य शासनाने केवळ कृषी वीज ग्राहकांसाठी ९२ कोटी रुपयांची सबसिडी सुरू ठेवली. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि उद्योगांवर पडला. त्यांच्या वीज बिलात २० टक्के वाढ झाली. खूप आरडाओरड झाल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषीसोबतच उद्योगांनाही सवलत देण्यासाठी ३९७ कोटी रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला.शासनाने याचे संकेत महावितरणला आधीच दिले होते. अशा परिस्थितीत स्वाभाविकपणे डिसेंबरमध्ये येणारे वीज बिल २० टक्के वाढीव यायला नको होते परंतु असे झाले नाही. उद्योगांवर ३९७ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार टाकण्यात आला. आता महावितरण सांगत आहे की, सबसिडीची रक्कम पुढच्या बिलात अ‍ॅडजस्ट केली जाईल. परंतु इतक्या मोठ्या रकमेवरील व्याजाबाबत मात्र महावितरणचे अधिकारी काही बोलायला तयार नाहीत. सहा टक्के व्याजही पकडले तर ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपये इतकी होते. त्यामुळे साहजिकच महावितरणला काहीही न करता २५ कोटी रुपयाची कमाई झाली आहे.