लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मुलांना खुल्या प्रवर्गात नोकरी नाकारण्याचा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) काढण्यात आला आहे. हा आदेश संविधानविरोधी असून, तो तत्काळ रद्द करीत आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी मागणी केली. विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले.आरक्षित वर्गातून अर्ज भरल्यास संबंधित विद्यार्थ्यास अर्ज भरताना सवलत मिळते. खुल्या प्रवर्गातून अर्ज केल्यास याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कोणताही विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतो. त्याची खुल्या प्रवर्गात नोंद होते. एमपीएससी परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास एमपीएससीकडून जात विचारणा करण्यात येत आहे. खुल्या प्रवर्गातून अर्ज करून मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी आरक्षित वर्गातील असल्यास तो अपात्र ठरवून नोकरी नाकारण्यात येत आहे. हा प्रकार जातीव्यवस्थेला प्रेरणा देणारा आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, मागासवर्गीयांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. त्यांना आमदार जोगेंद्र कवाडे यांनी प्रतिसाद देत लोकसेवा आयोगावर नवीन अध्यक्ष नेमावा व जीआरची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली.
एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 21:04 IST
ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मुलांना खुल्या प्रवर्गात नोकरी नाकारण्याचा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) काढण्यात आला आहे. हा आदेश संविधानविरोधी असून, तो तत्काळ रद्द करीत आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी मागणी केली. विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले.
एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवा
ठळक मुद्देहरिभाऊ राठोड यांची मागणी