अजय संचेती : एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी देणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळत शनिवारी राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. हा राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात क्रांतिकारी निर्णय ठरला आहे. त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु मुख्यमंत्री व कॅबिनेट सहकाऱ्यांचे केवळ कौतुक करून चालणार नाही. या निर्णयाला हातभार म्हणून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत देण्याची घोषणा खासदार अजय संचेती यांनी केली आहे. सोबतच राज्यातील सर्व खासदारांनी (लोकसभा व राज्यसभा) एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत देऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांला फायदा होणार आहे. ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा क ोरा होणार आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करीत आहेत त्यांनाही २५ टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील भाजपा-शिवसेना व इतर पक्षांच्या महायुतीचे सरकार शेतकऱ्यांचे कै वारी असल्याचे सिद्ध झाले आहे. आश्वासनाची पूर्तता करून एका कृतिशील सरकारचे कृतिशील मुख्यमंत्री असल्याचे फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. सर्व घटकांना समाधान देता येईल याचा अभ्यास करून कर्जमाफ ीसाठी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना तयार केली. यातून त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यासोबतच त्यांना ‘ढ’ विद्यार्थी म्हणून संबोधणाऱ्या विरोधकांनाही चपराक बसली आहे. शेतकऱ्यांना मदत फक्त सरकारी तिजोरीतूनच नाही तर आपल्या खिशातूनही द्यायला हवी. या भावनेतून मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक महिन्याचे वेतन कर्जमाफीच्या गंगाजळीत टाक ण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी व आमदार अभिनंदनास पात्र असल्याचे अजय संचेती यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी खासदारांनी पुढे यावे
By admin | Updated: June 25, 2017 02:32 IST