शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खासदाराची साद; रेल्वेमंत्र्यांची दाद ! पत्र लिहून दिली खुशखबर : जनतेसोबत लोकप्रतिनिधींचीही मागणी पूर्ण

By नरेश डोंगरे | Updated: May 31, 2025 21:29 IST

काय आहे रेल्वेमंत्र्यांच्या पत्रात ?

नरेश डोंगरे

नागपूर : लोकांच्या सुविधेसाठी एका खासदाराने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साद घातली. त्याला दाद देत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी संबंधित खासदाराला पत्र लिहून गुड न्यूज दिली. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील खासदाराला रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या या 'गुड न्यूज'मुळे नागपूर विदर्भातील प्रवाशांनाही फायदा होणार आहे. प्रकरण आहे एका नव्या रेल्वेगाडीला सुरू करण्याचे !

बालाघाट (मध्य प्रदेश)च्या खासदार भारती पारधी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती. बालाघाटवरून नागपूर, पुण्याला जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बालाघाट-पुणे रेल्वे मार्गावर एक नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी यावेळी खा. पारधी यांनी केली होती. त्याला अनुसरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. पारधी यांना २८ मे रोजी एक पत्र लिहिले. जनहितार्थ केलेल्या तुमच्या मागणीची दखल घेत रिवा-पुणे ही नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचा रेल्वे बोर्डाने निर्णय घेतल्याचे त्यात नमूद करून ही गाडी व्हाया बालाघाट जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

'गुड न्यूज'चा फिल

२९ मे रोजी जारी केलेल्या रेल्वे बोर्डाच्या पत्र (सीसी -९३/ २०२५) नुसार, नवीन रीवा -पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस गोंदिया, नागपूर, वर्धा, भुसावळ, मनमाड, कोपरगावमार्गे धावणार आहे. यासंबंधाने अधिकाऱ्यांकडून फारशी माहिती मिळू शकली नाही. मात्र, रेल्वेमंत्र्यांकडून पाठविण्यात आलेले हे पत्र आज रेल्वेच्या वर्तुळात चांगलेच व्हायरल झाले आहे. परिणामी, अनेकांना 'गुड न्यूज'चा फिल आला आहे.नव्या गाडीचा वैदर्भीयांनाही फायदा

विशेष म्हणजे, या नवीन गाडीचा वैदर्भीय जनतेलाही फायदा होणार आहे. कारण, नागपूर-पुणे-नागपूर रेल्वे मार्गावर वर्षभर प्रवाशांची गर्दी असते. प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत या मार्गावर उपलब्ध असलेल्या रेल्वेगाड्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे नागपूर-पुणे मार्गावरच्या प्रत्येक रेल्वे गाडीत खच्चून गर्दी असते. आता रिवा पुणे ही नवीन रेल्वेगाडी नागपूरमार्गेच धावणार असल्याने वैदर्भीय प्रवाशांनाही त्याचा लाभ मिळणार आहे.