शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार क्रीडा महोत्सव : वादळी पावसाने समारोपीय उत्साहावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:05 IST

सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी शनिवारी यशवंत स्टेडियमवर गोळा झालेल्या हजारो क्रीडाप्रेमींना निराश होऊन परतावे लागले. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, पुरस्कार वितरण व सत्कार समारंभासाठी मास्टर ब्लास्टर येणार होते. मात्र समारोपाच्या उत्साहावर वादळासह आलेल्या पावसाने विरजण टाकले. वादळामुळे सचिनचे विमान परत वळविल्याची घोषणा होताच पावसातही आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहते आणि क्रीडाप्रेमींची निराशा झाली.

ठळक मुद्देसचिनचे विमान औरंगाबादकडे वळले : कार्यक्रम पुढे ढकलला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी शनिवारी यशवंत स्टेडियमवर गोळा झालेल्या हजारो क्रीडाप्रेमींना निराश होऊन परतावे लागले. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, पुरस्कार वितरण व सत्कार समारंभासाठी मास्टर ब्लास्टर येणार होते. मात्र समारोपाच्या उत्साहावर वादळासह आलेल्या पावसाने विरजण टाकले. वादळामुळे सचिनचे विमान परत वळविल्याची घोषणा होताच पावसातही आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहते आणि क्रीडाप्रेमींची निराशा झाली.खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त यशवंत स्टेडियमवर भव्य तयारी करण्यात आली होती. सचिन तेंडुलकर येणार यामुळे स्टेडियमवर ५ वाजतापासून चाहत्यांची गर्दी वाढत चालली होती. आयोजकांकडून संगीतमय कार्यक्रमाची मेजवानीही देण्यात आली. गायिका श्रेया खराबे यांच्यासह ‘अतृप्त बॅन्ड’चा गिटारवादक जॅक थॉम, वैभव (किबोर्ड), शांतनू (ड्रम) तसेच आरजे राजन व आरजे मोना यांनी वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे दर्शकांचा उत्साह अजूनच वाढला होता. बॉलिवूडच्या गीतांवर दर्शक थिरकायला लागले होते. याशिवाय सचिनच्या हस्ते सत्कार होणारे क्रीडा क्षेत्रातील २० मान्यवर तसेच रणजी करंडक विजेता विदर्भाचा संघ स्टेडियमवर दाखल झाला होता. सोबतच छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूही डायसवर पोहचले होते. मात्र ६.४५ वाजताच्यादरम्यान अचानक वातावरण बदलले. सायंकाळपर्यंत अतिशय तापलेला सूर्य अचानक ढगाआड गेला आणि वादळाला सुरुवात झाली. पाऊस येणार नाही अशी आशा बाळगून असलेले निवेदक लोकांना शांत करत होते. मात्र अखेर पावसाने आपला खेळ सुरू केलाच. सुरुवातीला हळुहळू येणाºया पावसाचा जोर वाढला आणि स्टेडियमवर गोळा झालेले दर्शक सैरभैर पळत आसरा शोधत होते. काही दर्शक पावसाचा आनंद घेत स्टेडियममध्येच थांबले होते.अर्धा-पाऊण तास पावसाने स्टेडियम चांगलेच ओले केले. त्यामुळे कार्यक्रम होणार की नाही हा संशय लोकांना होता. मात्र सचिन येईल ही उत्सुकता लागून होती. त्यामुळे लोक थांबून होते. शेवटी क्रीडा महोत्सवाचे मुख्य संयोजक संदीप जोशी यांनी, सचिनचे चार्टर्ड विमान पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे औरंगाबादकडे वळविल्याचे सांगत हा कार्यक्रम पुढे ढकलल्याचे जाहीर केले. कार्यक्रम रद्द झाला नाही, मात्र पुढे ढकलण्यात आला असून लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बराच वेळ वाट पाहत असलेले क्रीडाप्रेमी निराश होऊन घराकडे परतायला लागले.माध्यमांशी बोलताना संदीप जोशी म्हणाले की समारोपीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी तयारी केली होती. पण पावसाला थांबविणे आमच्या हातात नव्हते. त्यांनी स्टेडियमवर पोहचलेल्या नागपूरकरांचे आभारही मानले. आमचा उत्साह कमी झालेला नसून कार्यक्रमाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी होणारी वॉकथॉन नियोजित वेळेनुसार होईल, असे सांगत नागरिकांनी वॉकथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sportsक्रीडाMember of parliamentखासदार