शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाला फार महत्व देऊ नये, तिची तितकी लायकी नाही : खासदार कृपाल तुमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 14:11 IST

महात्मा गांधींबद्दल बोलण्याची कंगनाची लायकी नाही, ती तुच्छ महिला असून अशा बाईबद्दल मला बोलायचं नाही, अशी प्रतिक्रिया खासदार कृपाल तुमाने यांनी दिली.

नागपूर : नेहमीच वादग्रस्त विधान करणाऱ्या कंगनावर 'महात्मा गांधी'बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरावरून टीकेची झोड उडत आहे. असे असले तरी, बाईं सुसाटपणे बोलत सुटते. तिच्या वक्तव्यावर आता रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनीही जोरदार टीका केली आहे. 

कंगनाने 'महात्मा गांधीं'बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना तुमाने म्हणाले, कंगनाला पद्मश्री कसा मिळाला, कोणाचे पाय चाटून मिळाला हे सर्वांनाच माहित आहे. महात्मा गांधींबाबत बोलण्याची तिची लायकी नाही, त्यांना सत्तेची लालसा असती तर, ते त्यावेळी प्रधानमंत्री-राष्ट्रपती काहीही होऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कंगना तुच्छ महिला असून अशा बाईबद्दल मला बोलायचं नाही. मीडियानं तिला फारसं महत्व देऊ नये, असंही तुमाने बोलताना म्हणाले. 

कंगनाच्या पोस्टमध्ये काय?

कंगनाने भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळाले, असे विधान केले होते. त्यानंतर, तिने पुन्हा एकदा महात्मा गांधींविषयी अनुदार उद्गार काढत, महात्मा गांधींमध्ये अजिबात हिंमत नव्हती, ते अतिशय चलाख व सत्तेची लालसा असणारे होते, असे म्हटले. यासोबतच, तिने भगतसिंग यांना फाशी व्हावी, अशीच त्यांची इच्छा होती. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कधीच पाठिंबा दिल नाही, अशी वक्तव्ये केली.

यानंतर, तिच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उडत आहे. अनेकांनी तिची लायकी व अक्कलच काढली आहे. स्वातंत्र्यसंग्रामात भाग न घेतलेली अशी मंडळी या लढ्याला बदनाम करू पाहत आहेत, असे लोकांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणKangana Ranautकंगना राणौतKrupal Tumaneकृपाल तुमानेMahatma Gandhiमहात्मा गांधी