शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

खासदार डॉ. विकास महात्मे यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:00 IST

दिल्लीतील एका ठगाने खासदार डॉ. विकास हरिभाऊ महात्मे यांना दीड लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात ठगबाजाने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. महात्मे यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. राकेश सप्रू असे आरोपीचे नाव असून तो नवी दिल्लीतील मालवीय नगरात राहतो.

ठळक मुद्देदिल्लीतील ठगबाजाने घातला गंडा : धंतोलीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीतील एका ठगाने खासदार डॉ. विकास हरिभाऊ महात्मे यांना दीड लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात ठगबाजाने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. महात्मे यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. राकेश सप्रू असे आरोपीचे नाव असून तो नवी दिल्लीतील मालवीय नगरात राहतो.डॉ. महात्मे यांचे वर्धा मार्गावरील सेंट्रल एक्साईज कॉलनीत कार्यालय आहे. २४ नोव्हेंबर २०१६ ला सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता डॉ. महात्मे यांचा आरोपी सप्रूसोबत पहिल्यांदा संपर्क झाला. महात्मे यांना वूल शेअरिंग मशीन आणि लॉ कटर घ्यायचे होते. या दोन्ही उपकरणांचे आरोपी सप्रूने डॉ. महात्मे यांना कोटेशन पाठविले. ते मंजूर करून डॉ. महात्मे यांनी सपू्रला १ लाख, ५५ हजार, २७ रुपयांचा धनादेश पाठविला. त्याची रक्कम घेतल्यानंतर १५ दिवसात दोन्ही उपकरण उपलब्ध करून देण्याचा करारनामा आरोपीने केला होता. मात्र, अनेक महिने उलटून गेल्यानंतरही आरोपीकडून कराराची पूर्तता झाली नाही. उपकरणे मिळावी म्हणून डॉ. महात्मे यांच्या कार्यालयातून बरेचदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, आरोपीकडून प्रतिसाद नव्हता. त्यामुळे आरोपी सप्रूने दिलेल्या कार्यालयातील पत्त्यावर संपर्क करण्यात आला. तेथे आरोपीचे कार्यालयच नव्हते. त्यामुळे त्याच्याशी फोनने संपर्क करण्यात आला. यावेळी आरोपीने डॉ. महात्मे यांना त्यांची रक्कम परत देतो, असे म्हणून अ‍ॅक्सिस बँकेचा धनादेश पाठविला. तो बँकेत जमा केला असता आरोपीच्या खात्यात रक्कम नसल्याने तो वटलाच नाही. त्याने फसवणूक केल्याची खात्री झाल्याने डॉ. महात्मे यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सप्रूचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मेfraudधोकेबाजी