आकर्षक बनणार अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:27 AM2017-10-28T01:27:35+5:302017-10-28T01:29:12+5:30
रामझुला ते प्रजापतीनगर चौकाकडे जाणाºया मेट्रो रेल्वे मार्गावर सेंट्रल एव्हेन्यू येथील अग्रसेन चौकात मेट्रो स्टेशन आकर्षक बनविण्यासाठी डिझाईन तयार करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामझुला ते प्रजापतीनगर चौकाकडे जाणाºया मेट्रो रेल्वे मार्गावर सेंट्रल एव्हेन्यू येथील अग्रसेन चौकात मेट्रो स्टेशन आकर्षक बनविण्यासाठी डिझाईन तयार करण्यात आले आहे. पश्चिमहून पूर्वला जोडणारी आणि या भागातील नागरिकांसाठी लाईफलाईन बनणाºया मेट्रो रेल्वेच्या दोन स्टेशनचे डिझाईन एकसारखे बनविण्यात आले आहे.
यामध्ये एक अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन आणि दुसरे दोसर वैश्य चौक मेट्रो स्टेशन डिझाईनचा समावेश आहे. स्टेशनचे प्रारंभिक बांधकाम सुरू झाले आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या पुढाकाराने नागपूरचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच कारणामुळे बहुतांश मेट्रो स्टेशनचे डिझाईन आगळेवेगळे आहे. अग्रसेन मेट्रो स्टेशन गांधीबाग आणि इतवारी या व्यावसायिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार अहे.
अग्रसेन चौकाच्या चारही बाजूला जुन्या निवासी वस्त्या असल्यामुळे येथील रहिवासी मेट्रो रेल्वेचा वाहतुकीसाठी उपयोग करतील. गांधीबाग, जलालपुरा, हंसापुरी, खदान परिसर, भालदारपुरा आणि लगतच्य वस्त्यांसाठी अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन केंद्रबिंदू ठरणार आहे.
सुलभ वाहतूक आणि वेळेनुसार मेट्रो रेल्वेचे संचालन होणार असल्यामुळे निश्चितच या भागात व्यावसायिक चहलपहल वाढणार आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी पार्किंग, आसपासच्या नागरिकांना ये-जाकरिता फिडर सेवा उपलब्ध राहतील. यासह दिव्यांग आणि वयस्कांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहेत. मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी अनुकूल बनविण्याच्या दिशेने मेट्रो व्यवस्थापन विशेष प्रयत्न करीत आहे.