शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समता प्रतिष्ठानचे मुख्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:30 IST

दिल्लीच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आंबेडकरी चळवळीचे केंद्र व जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात या प्रतिष्ठानचे मुख्यालय उघडण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या या प्रतिष्ठानचे मुख्यालय मंत्री बदलताच मुंबईला हलवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनागपूरचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आंबेडकरी चळवळीचे केंद्र व जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात या प्रतिष्ठानचे मुख्यालय उघडण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या या प्रतिष्ठानचे मुख्यालय मंत्री बदलताच मुंबईला हलवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे.समता प्रतिष्ठानचा मुख्य हेतू समाजात भारतीय संविधानाला अपेक्षित समता प्रस्थापित करणे आहे. प्रतिष्ठानतर्फे समाजातील सर्वच दुर्बल घटकांना तसेच शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेशातील जनतेला उच्च दर्जाचे शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे, समताधिष्ठित मूल्य जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने वाचनालय, अभ्यास कक्ष, संशोधन संस्था, शैक्षणिक केंद्रे इत्यादींची स्थापना करणे, तसेच विविध दुर्बल समाज घटकांच्या उन्नतीसाठी कार्यात्मक येजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणे याशिवाय दुर्बल घटकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या प्रतिष्ठानची स्थापना १० जुलै २०१७ रोजी कंपनी कायदा २०१३ च्या अनुच्छेद ८ अंतर्गत कुठलाही नफा न कमविण्याच्या तत्त्वावर करण्यात आली. सध्या प्रतिष्ठानचे कार्यालय हे सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये आहे. परंतु उत्तर नागपुरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकर कन्वेंशन सेंटरच्या भव्य इमारतीमध्ये प्रतिष्ठानचे कार्यालय लवकरच सुरू होणार आहे. यासाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बरेच परिश्रम घेतले आहे. प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे हे समता प्रतिष्ठान मुंबईला हलविण्याच्या तयारीत आहेत. पुणे येथे हलवण्याचीही चाचपणी केली जात आहे. मंत्र्यांच्या कामासाठी सोयीचे ठरावे म्हणून समता प्रतिष्ठान मुंबईला हलवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. परंतु हे महत्त्वाचे कार्यालय नागपुरातून हलवणे म्हणजे नागपूरचे महत्त्व कमी करण्यासारखेच होय. स्वत: मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात यकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 मुख्य उद्देशालाच धक्का  दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. तेव्हा याच्या मुख्यालयासाठी केवळ नागपूर शहराचेच नाव निश्चित करण्यात आले होते. नागपुरातील दीक्षाभूमी ही जगाला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच समता प्रतिष्ठानचे मुख्यालय हे नागपूर या परिवर्तन स्थळीच करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. पुरोगामी विचाराने प्रेरित या मातीतूनच प्रबोधनाचा संदेश जगभर पोहचावा, अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचे संगण्यात आले होते. तेव्हा हे कार्यालय नागपुरातून हलवण्यात आल्यास याच्या मूळ उद्देशालाच धक्का लावल्यासारखे होईल. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMumbaiमुंबई