शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ वसतिगृहातील विलगीकरण कक्ष स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 22:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशास्थितीत तेथील विलगीकरण कक्ष त्वरित स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम तसेच विधिसभा सदस्यांनी केली आहे.

ठळक मुद्देमाजी कुलसचिव, विधिसभा सदस्यांची मागणीगरीब विद्यार्थ्यांना ‘लॅपटॉप’, ‘स्मार्टफोन्स’ पुरवावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशास्थितीत तेथील विलगीकरण कक्ष त्वरित स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम तसेच विधिसभा सदस्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.१ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थी परत आल्यानंतर ते कुठे राहतील, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे विलगीकरण केंद्र स्थलांतरित करून परिसराचे निर्जंतुकीकरण झाले पाहिजे. तसेच वसतिगृहात सील करून ठेवण्यात आलेली विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे विद्यार्थ्यांना तात्काळ सुपूर्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.कुणीही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थी साहाय्यता निधी, विद्यार्थी कल्याण निधी व आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत करण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप, स्मार्टफोनसह इतर सोयीसुविधा तात्काळ पुरविण्यात याव्या. यासाठी नियमावली तयार करण्यात यावी. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात संविधान प्रास्ताविका पार्कचे बांधकाम ‘लॉकडाऊन’मुळे थांबले होते. त्या बांधकामाची प्रक्रिया एका आठवड्यात सुरू करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.शिष्टमंडळात डॉ. ओमप्रकाश चिमणकर, डॉ. केशव मेंढे, प्रा. प्रशांत डेकाटे, स्नेहल वाघमारे, डॉ. नीरज बोधी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी