शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ऑटोचालक सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 22:45 IST

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांवर संकट कायम आहे.

ठळक मुद्देव्यवसाय बंद, आवक नाही : चौथ्या लॉकडाऊनमध्ये दिलासा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांवर संकट कायम आहे.शहर उघडले आहेत. आरटीओ कार्यालय सुरू झाले आहे पण ऑटोचालकांना परवानगी मिळाली नाही. आधीच बेरोजगार असलेल्या आॅटोचालकांना इतर उद्योगांप्रमाणे पॅकेजची गरज आहे, अशी भावना विदर्भ ऑटो चालक-मालक संघटनेचे विलास भालेकर यांनी व्यक्त केली. कुटुंबाचे पालनपोषण करता यावे म्हणून ऑटोचालकाना ५००० रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी सांगितले की ८० टक्के ऑटोचालकांवर वाहन कर्ज आहे. कर्जधारकांना ऑगस्टपासून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी दिलासा दिला आहे पण व्याज जिवंत आहे. दोन महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या ऑटोचालकांना कुटुंबासाठी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असताना व्याजाचे पैसे कसे भरणार, हा प्रश्न आहे. प्रत्येकाला ३५०० ते ५००० रुपये कर्जाचे हफ्ते भरावे लागतात. व्यवसाय बंद आहे, शिवाय शाळा, कॉलेज बंद असल्याने होणारी थोडीबहुत आवकही बंद आहे. त्यामुळे हे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न भालेकर यांनी उपस्थित केला. सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून ऑटोचालकाना दिलासा द्यावा, पॅकेज द्यावे आणि त्यांना आपला व्यावसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेतर्फे भालेकर यांनी केली.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्या