शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

बाळ दगावल्याने मातेने फोडला हंबरडा

By admin | Updated: July 21, 2016 02:10 IST

रेल्वे प्रवासात एका सहा महिन्यांच्या बाळाने आपल्या आईच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला.

 रेल्वेस्थानकावरील घटना : अनेकांच्या डोळ््यात अश्रू नागपूर : रेल्वे प्रवासात एका सहा महिन्यांच्या बाळाने आपल्या आईच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. हावडा-हाफा एक्स्प्रेस नागपूरला येताच रेल्वेच्या डॉक्टरांनी या बाळाला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर या बाळाच्या मातेने एकच हंबरडा फोडला. ती बाळाला कुशीत घेऊन ओक्साबोक्सी रडत होती. हे चित्र पाहून तेथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ओम उदय सरकार (सहा महिने) असे या बाळाचे नाव आहे. तो आपले वडील उदय सरकार आणि आईसोबत रेल्वेगाडी क्रमांक १२९०६ हावडा-हाफा एक्स्प्रेसने (कोच एस-५, बर्थ ६१) हावडा ते मुंबई असा प्रवास करीत होता. बिलासपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या चिमुकल्याची प्रकृती अचानक बिघडली. रेल्वेच्या डॉक्टरांनी थातूरमातूर पाहणी करून त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना केले. गोेंदिया रेल्वेस्थानक येण्यापूर्वी या चिमुकल्याची प्रकृती आणखीनच गंभीर झाली. गाडीतील टीसीने सूचना देऊनही गोंदिया रेल्वेस्थानकावर एकही डॉक्टर या बाळावर उपचार करण्यासाठी आला नाही. त्यामुळे पुन्हा गाडीतील टीसीने नागपूर येथे उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयास सूचना दिली. लगेच रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. हावडा-हाफा एक्स्प्रेस दुपारी ४.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर येताच रेल्वेच्या डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केले. आपले बाळ जिवंत नाही असे समजताच मातेच्या पायाखालील वाळू सरकली. तिने ओक्साबोक्सी रडण्यास सुरुवात केली. रेल्वेत मृत्यू झाल्यामुळे उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. लोहमार्ग पोलिसांनी कागदोपत्री कारवाई करून या बाळाला शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविले. या चिमुकल्याच्या मातेचा टाहो पाहून रेल्वेस्थानकावर उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. (प्रतिनिधी)