शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीला कुंटनखान्यावर विकले; निर्दयी आईवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 11:03 IST

जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीला तीनदा विकून त्यातून पैसा कमावल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. या प्रकाराला कंटाळून हिंमत करून मुलीने बुधवारी तिच्या निर्दयी आईविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याने हा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जन्म देणाऱ्या आईनेच पैशासाठी वेश्याव्यवसायात ढकलल्याने चार वर्षांपासून नरकयातना भोगणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने अखेर पोलीस ठाणे गाठले. तिची कैफियत नोंदवून पोलिसांनी तिच्या आईवर पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

पीडित मुलगी बाहेरगावची रहिवासी आहे. २०१७ मध्ये तिच्या आईने तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी नातेवाइकांच्या स्वाधीन केले. नातेवाइकांनी मुलीला एका डान्सबारमध्ये सोडले. मुलीची इच्छाच नसल्याने डान्सबारवाल्यांना तिचा परफॉर्मन्स चांगला वाटला नाही. त्यामुळे त्यांनी तिला तिच्या गावी पोहोचवले.

२०१८ मध्ये तिच्या आईने एका व्यक्तीला २ लाखांत विकले. त्या ठिकाणी पीडितेचे लैंगिक शोषण झाले. मात्र, तिच्याकडून पाहिजे तसा फायदा मिळत नसल्याने त्या व्यक्तीनेही मुलीला तिच्या गावात नेऊन सोडले. २०२० मध्ये पुन्हा तिच्या आईने नातेवाइकांच्या मदतीने नागपूरच्या कुंटनखान्यात विकले. येथे पीडित मुलीच्या जेवणात गुंगीचे औषध मिळवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जाऊ लागला. तिला मारहाणही होत होती. संधी साधून ती एका ग्राहकाच्या मदतीने नागपुरातून गावी परत गेली.

आजीने दिली साथ

यावेळी तिच्या आजीने तिला साथ दिली. तू येथे राहिलीस तर तुला पुन्हा तुझी आई वेश्याव्यवसायात ढकलेल, असे सांगून तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पीडित मुलीने लकडगंज ठाणे गाठून बुधवारी स्वत:च्या आईविरुद्ध तक्रार नोंदवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी