शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-वर्धा रोडवर ट्रॅव्हल्सच्या धडकेत आईसह मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:45 IST

नागपूर- वर्धा मार्गावर एका भरधाव ट्रॅव्हल्सने कारला जबर धडक दिली. त्यात आईसह मुलाचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील तिघे जखमी झाले.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील तिघे जखमीजामठ्याजवळ कारला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर- वर्धा मार्गावर एका भरधाव ट्रॅव्हल्सने कारला जबर धडक दिली. त्यात आईसह मुलाचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातील तिघे जखमी झाले. हा अपघात हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा शिवारात रविवारी (दि. २१) सायंकाळी ५ वाजातच्या सुमारास झाला.अभिजित चंद्रकांत जोशी (३५) आणि त्याची आई आशा चंद्रकांत जोशी (६०) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये मृत अभिजितचा भाऊ मिलिंद जोशी (२८), अभिजितची पत्नी सृष्टी जोशी (३०) आणि मुलगी गार्गी जोशी (७) सर्व रा. रुक्मिणीनगर, वर्धा यांचा समावेश आहे. मिलिंद हा अविवाहित असून त्याच्या लग्नासाठी वधूपक्षाकडे चर्चा करण्यासाठी सर्वजण नागपूरला आले होते. त्यांच्यासह भंडारा येथून अभिजितचे जावई नितीन कुळकर्णी आणि बहीणसुद्धा आली होती. नागपुरात वधूपक्षाकडे रविवारी बोलणी झाल्यानंतर जोशी कुटुंब हे आपल्या एमएच-३१/ईए-८८३४ क्रमांकाच्या कारने वर्धाकडे जात होते. दरम्यान जामठ्याजवळ बुटीबोरीकडून नागपूरकडे येणाऱ्या एमएच-३०/पी-९९९५ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने कारला जबर धडक दिली. त्यात कारमधील अभिजित आणि त्याची आई आशा यांचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ, पत्नी आणि मुलगी जखमी झाले. अपघातानंतर या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी हिंगणा पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर लगेच जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती केले. जखमींपैकी सृष्टी जोशी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक मोहम्मद अहफाज अब्दुल रहीम (५३, रा. निराला सोसायटी, ताजबाग, नागपूर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३८, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला हिंगणा पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात