शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या पायथ्यातील गावांमध्ये मूत्रपिंडाचे सर्वाधिक रुग्ण : धनंजय उखळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:58 IST

अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात मूत्रपिंड निकामी रुग्ण, विशेषत: सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत.

ठळक मुद्दे नेफ्रोलॉजी सोसायटीचा वार्षिक सोहळा रविवारी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात मूत्रपिंड निकामी रुग्ण, विशेषत: सातपुड्याच्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहेत. येथील पाण्याच्या तपासणीसाठी ‘नीरी’ची मदत घेतली जात आहे. आतापर्यंत ६० रुग्ण या आजाराचे आढळून आले आहे. लवकरच या संदर्भातील अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती, वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय ऊकळकर यांनी येथे दिली.मूत्रपिंड (किडनी) विशेषज्ञ डॉक्टरांची संस्था ‘दि नेफ्रोलॉजी सोसायटी’चा वार्षिक सोहळा रविवार १५ मार्च रोजी रामदासपेठ येथील खासगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. पत्रपरिषदेला ‘दि नेफ्रोलॉजी सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, सचिव डॉ. निशांत देशपांडे, डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. सुनीती खांडेकर व डॉ. विशाल रामटेके उपस्थित होते.डॉ. देशपांडे म्हणाले, दरवर्षी जागतिक मूत्रपिंड दिनी, संस्थेच्या वार्षिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी पीजीआय-चंदीगढ येथील नेफ्रोलॉजीच्या डॉ. ऋतंभरा नाडा, एसजीपीजीआय-लखनौ येथील रिनल न्युट्रिशनच्या डॉ. अनिता सक्सेना विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कार्यशाळेच्या पहिला दिवस म्हणजे १४ मार्चला पॅथॉलॉजी सोसायटीच्या सहकार्याने ‘केस डिस्कशन’ आयोजित केले आहे. नेफ्रो पॅथोेलॉजिस्ट डॉ. राजन दुग्गल मार्गदर्शन करतील. ‘कॉम्प्लिमेन्ट ग्लोमेरुलोपॅथी’ या विषयावर डॉ. ऋतुंभरा नाडा, पद्मश्री डॉ. बी.एस. चौबे ओरेशन सादर करतील.मधुमेहामुळे ४० टक्के मूत्रपिंड निकामीडॉ. देशपांडे व डॉ. उखळकर म्हणाले, मधुमेहामुळे ४० ते ५० टक्के मूत्रपिंड निकामी होतात. या शिवाय, ‘क्रोनिक किडनी डिसीज’मुळे (सीकेडी) २० टक्के, उच्च रक्तदाबामुळे १२ ते १४ टक्के तर ‘पेन किलर्स’ व स्वत:हून औषधे घेतल्याने पाच ते १० टक्के मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते.देशात मूत्रपिंड विकाराचे २ हजार डॉक्टरविविध कारणांमुळे मूत्रपिंड विकाराचे रुग्ण वाढत आहे. परंतु त्या तुलनेत मूत्रपिंड विशेषज्ञांची संख्या फारच कमी आहे. भारताचा विचार केल्यास केवळ दोन हजार विशेषज्ञ आहेत. त्यातही मूत्रपिंड पॅथॉलॉजिस्टची संख्या फक्त ४०च्या आत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरMediaमाध्यमे