शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वाधिक महागडे पार्किंग नागपूर विमानतळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:06 IST

नागपूर : पार्किंगसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) नियम देशातील सर्वच विमानतळांसाठी बंधनकारक आहेत. त्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ...

नागपूर : पार्किंगसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) नियम देशातील सर्वच विमानतळांसाठी बंधनकारक आहेत. त्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहनचालकांकडून देशातील अन्य विमानतळापेक्षा दुप्पट, तिप्पट शुल्क वसूल करण्यात येत असल्याची बाब माहितीच्या अधिकाराद्वारे मागितलेल्या माहितीतून उघड झाली आहे. नागपूर विमानतळाचे व्यवस्थापन एएआयच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहे. पार्किंग शुल्कावर नियंत्रण आणण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

पार्किंग शुल्काची लूट थांबवा

आरटीआय कार्यकर्ते संजय थूल यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर, पुणे, पोर्ट ब्लेअर, कोलकाता, चेन्नई या विमानतळावरील पार्किंग शुल्काचे दर मागितले आहेत. त्यानुसार नागपूर विमानतळावर मनमानी शुल्क वसूल करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागपूर विमानतळाचे संचालन राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) कंपनीतर्फे करण्यात येते. कंपनीने पाच वर्षांसाठी पार्किंगच्या निविदा काढून कंत्राटी पद्धतीवर दिले आहे. मार्च २०२१ पर्यंत विमानतळाने ११.२१ कोटी रुपये गोळा केले आहेत. नागपूर विमानतळ सी वर्गवारीत येत असतानाही वसूल करण्यात येणारे पार्किंगचे दुप्पट शुल्क वाहनचालकांवर अन्याय करणारे आहे. या शुल्काच्या माध्यमातून होणारी लूट थांबवावी, असे संजय थूल यांनी म्हटले आहे.

वाहनचालकांची फसवणूक

पार्किंगच्या नव्याने निविदा काढा

थूल म्हणाले, नागपूर विमानतळावर ३० मिनिटांसाठी बस व ट्रककरिता ११० रुपये, कार व अन्य वाहने ४० रुपये आणि दुचाकीकरिता ३० रुपये आणि ३० पेक्षा जास्त मिनिटांसाठी दुप्पट भाडे आकारण्यात येत आहे. याशिवाय निश्चित शुल्कासह टॅक्सी कॅबला ३० रुपये आणि ऑटोला २० रुपये कन्हिनियन्स शुल्क द्यावे लागतात. नागपूर विमानतळाची तुलना केल्यास पोर्ट ब्लेअर विमानतळावर ३० मिनिटांसाठी कोच (बस/ट्रक) ३० रुपये, टेम्पो, एसयूव्ही, मिनी बस, कारकरिता ३० रुपये, दुचाकीसाठी १० रुपये तसेच ३० पेक्षा जास्त मिनिटांसाठी कोच (बस/ट्रक) ७० रुपये, टेम्पो, एसयूव्ही, मिनी बसकरिता ६० रुपये, कार ५५ आणि दुचाकीसाठी १५ रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येते. तसेच चेन्नई आणि कोलकाता विमानतळावर ३० मिनिटांसाठी कोच, बस, ट्रककरिता ५० रुपये, अन्य वाहनांसाठी ४० रुपये, दुचाकी २० रुपये व ३० पेक्षा जास्त मिनिटांसाठी दुचाकीला २५ रुपये तर अन्य सर्व वाहनचालकांकडून दुप्पट शुल्क घेण्यात येते. पण नागपूर विमानतळ सी श्रेणीत येत असल्याने एएआयच्या नियमानुसार ३० मिनिटांसाठी कोच, बस, ट्रककरिता ३० रुपये, कार २० रुपये आणि दुचाकीकरिता १० रुपये पार्किंग शुल्क अपेक्षित आहे. पण मिहान इंडिया लिमिटेड कंपनी मनमानी करीत असून, हवे तेवढे शुल्क आकारून वाहनचालकांची फसवणूक करीत आहे. याशिवाय टर्मिनल इमारतीत पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ कार उभी राहिल्यास १२० रुपये शुल्क वसूल करते. अवैध वसुलीमुळे नागपूर विमानतळाच्या पार्किंग निविदा रद्द करून भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नियमानुसार निविदा काढाव्यात, अशी मागणी संजय थूल यांनी केली.