शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सर्रास फिरताहेत फरार गुन्हेगार

By admin | Updated: May 7, 2015 02:17 IST

खून आणि इतर दुसऱ्या गंभीर आरोपात पोलिसांना हवे असलेले कुख्यात फरार असलेले आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. असे ४१७ गुन्हेगार पोलिसांच्या दस्तऐवजानुसार अनेक वर्षांपासून फरार आहेत.

जगदीश जोशी  नागपूरखून आणि इतर दुसऱ्या गंभीर आरोपात पोलिसांना हवे असलेले कुख्यात फरार असलेले आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. असे ४१७ गुन्हेगार पोलिसांच्या दस्तऐवजानुसार अनेक वर्षांपासून फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांकडे वेळ नाही. मंगळवारी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागलेल्या यादीत चंदा ठाकूर हिच्या प्रकरणावरून शहर पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. पोलीस आयुक्त एस.पी. यादव हे शहर पोलिसांत ‘वर्क कल्चर’ आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी पोलिसांचा रुबाब वाढविण्यासाठी स्वत:च्या कार्यालयातूनच याची सुरुवात केली आहे. परंतु पोलीस ठाण्यातील कामकाजात मात्र अजूनही बदल घडून आलेला नाही. लोकमतने १ मे रोजी चंदा ठाकूरबाबत वृत्त प्रकाशित केले होते. २९ एप्रिल २०१४ रोजी गणेशपेठ येथील नीलेश हजारेचा खून करण्यात आला होता. यात गणेशपेठ येथील महिला गुन्हेगार प्रेमा दरवाडे, तिचा मुलगा, तिचे तीन मित्र, चंदा ठाकूर आणि तिची मुलगी व जावई सहभागी होते. चंदा, मुलगी आणि जावई पुरावे नष्ट करण्याचे आरोपी होते. प्रेमा, तिचा मुलगा आणि तीन मित्रांना पकडण्यात आले होते. चंदाची मुलगी आणि जावयाने सत्र न्यायालयातून जामीन मिळविला होता. चंदाला जामीन न मिळाल्याने ती फरार झाली होती. नीलेश हत्याकांडाच्या तपास अधिकाऱ्यांनी चंदाला पकडण्यासाठी विशेष तत्परता दाखविली नाही. तिला फरार झाल्याचे दाखवून आरोपपत्रही सादर केले. पोलिसांची भीती नसल्याने फरार असूनही चंदा इतवारी स्टेशनजवळ आपला अड्डा चालवू लागली. लोकमतच्या वृत्तानंतर चंदा वर्षभरापासून फरार असल्याची माहिती उघडकीस आली. चंदा मादक पदार्थांची तस्कर असल्याने गुन्हे शाखा तिला शोधू लागली. दोन दिवस तिने पोलिसांना चकमा दिला. परंतु बुधवारी ती अड्ड्यावरच पोलिसांच्या हाती लागली. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतरही पोलिसांनी चंदाच्या अटकेसाठी कुठलीही गंभीरता दाखविली नाही. बुधवारी गुन्हे शाखेने तिला पकडल्यानंतर न्यायालयासमोर सादर करून एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली. पोलिसांना जे ४१७ फरारी गुन्हेगार हवे आहेत त्यात ५० पेक्षा अधिक गंभीर प्रकरणांमध्ये सहभागी असलेले सराईत गुन्हेगार आहेत. गुन्ह्यामुळेच त्यांचे अस्तित्व टिकून आहे. शहरात राहणे त्यांचा नाईलाज आहे. अशा परिस्थितीत पोलीस त्यांना आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून सहजपणे शोधू शकतात. परंतु त्यांच्या सक्रियतेमुळे पोलिसांचे खिसे गरम होत असल्याने पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. चंदा ठाकूरचे प्रकरणही तसेच आहे. चंदाच्या अड्ड्यावरून अनेक पोलिसांचे खिसे गरम होतात. मोमीनपुराचा कुख्यात वस्सी खान, नयन चिंतलवार, बबन पाटील, इशाक मस्के, हाजी, लाला राहाटे यासारखे डझनभर गुन्हेगार आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये फरार असलेले बहुतांश गुन्हेगार मोमीनपुऱ्यात लपले आहेत. परंतु पोलिसांची मोमीनपुऱ्यातील गल्ल्यांमध्ये फिरण्याची हिंमतच होत नाही.