शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

नागपुरातील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट; नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 10:56 IST

बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी व्हावी आणि व्यवहार सुरळीत व गतीने पार पडावेत यासाठी देशभरात एटीएम मशीन्सचे जाळे पसरण्यात आले. मात्र नागपुरातील बहुतांश एटीएमचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते बंद पडल्याची परिस्थिती आहे.

ठळक मुद्देएटीएमच्या शोधात फिरावे लागते चार - पाच कि.मी.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी व्हावी आणि व्यवहार सुरळीत व गतीने पार पडावेत यासाठी देशभरात एटीएम मशीन्सचे जाळे पसरण्यात आले. मात्र नागपुरातील बहुतांश एटीएमचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते बंद पडल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पैसे असलेल्या एटीएमच्या शोधात नागरिकांना चार ते पाच कि.मी. चे अंतर कापावे लागत आहे.मानेवाडा रोडतुकडोजी चौक ते मानेवाडा चौक दरम्यानच्या मार्गावर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बाजूलाच या बँकेचे एटीएम आहे. परंतु या एटीएममध्ये अनेकदा रक्कम नसल्याने पैसे काढण्यासाठी आलेल्या एटीएमधारकांना निराश होऊ न परतावे लागते. रविवारी या एटीएममध्ये रक्कम नसल्याने एटीएमधारकांना पैसे काढता आले नाही. या परिसरात बँक ऑफ इंडियाचे एकमेव एटीएम असूनही या एटीएममध्ये पैसेच नसतात. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात, अशी माहिती एटीएमधारकांनी दिली. नागपूर नागरिक सहकारी बँके च्या मानेवाडा रोडवर नागपूर नागरिक सहकारी बँक लि.ची शाखा आहे. शाखेच्या बाजूलाच बँकेचे एटीएम आहे. बँकेच्या खातेधारकांना सुविधा व्हावी, यासाठी एटीएम सुरू करण्यात आल्याचा गाजावाजा करण्यात आला होता.मात्र या एटीएममध्ये नेहमीच पैशाचा ठणठणाट असतो. रविवारी बँक बंद असल्याने अनेक एटीएमधारक पैसे काढण्यासाठी आले होते. परंतु पैसे नसल्याने एटीएम बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावर एटीएमधारकांनी नाराजी व्यक्त केली.मानेवाडा सिमेंट रोडवर वेणू कॉर्नरजवळ अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएमच्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत.बेसा, हुडकेश्वरकडून शहरात ये-जा करणाºया नागरिकांच्या मार्गावर हे एटीएम असल्यामुळे अनेक जण येथून पैसे काढतात. परंतु रविवारी सकाळपासून हे एटीएम बंद असल्यामुळे पैसे काढण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांना परत जावे लागले.मेहाडिया चौकधंतोली मेहाडिया चौक धंतोली पोलीस ठाणेकडे जाणाºया रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे एटीएम आहे. येथील एटीएम मशीन सुरू आहे. परंतु एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.सीताबर्डीसीताबर्डी येथील झांशी राणी चौकात बँक ऑफ इंडियाचे कार्यालय आहे. याला लागूनच बँकेचे एटीएम आहे. यात दोन एटीएम मशीन लागल्या आहेत. यापैकी एक मशीन बंद आहे. तर दुसरी मशीन बिघडली आहे.रामेश्वरी रोडरामेश्वरी मार्गावर तीन ते चार विविध बँकेचे एटीएम आहे. परंतु यातील युनियन बँकेचे एटीएम नेहमीच बंद राहत असल्याने बँकेच्या ग्राहकांना इतर एटीएमची सेवा घ्यावी लागते. विशेष म्हणजे, या मार्गावरील चारही ‘एटीएम’वर सुरक्षा रक्षक राहत नाही. काही एटीएमची दारे बंद होत नाही. वातानुकूलित यंत्राची सोय असताना ते नेहमीच बंद असते. अनेकवेळा एटीएममध्ये कुत्री बसलेली असतात.

टॅग्स :atmएटीएम