शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

महावितरणचे निम्म्याहून अधिक ग्राहक झाले डिजिटल; लघुदाब वीजग्राहकांची संख्या ५४ टक्क्यांवर

By आनंद डेकाटे | Updated: April 6, 2024 15:23 IST

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परिमंडलातील एकूण ९१ लाख ९२ हजार ५४८ व्यवहारांच्या माध्यमातून वीजग्राहकांनी घरबसल्या तब्बल २,२२० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला.

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महावितरणची वेबसाइट व मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या नागपूर परिमंडलात ५४ टक्यांवर गेली आहे तर, ऑनलाईन बिल भरणा केलेली रक्कम ६१.७२ टक्के झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परिमंडलातील एकूण ९१ लाख ९२ हजार ५४८ व्यवहारांच्या माध्यमातून वीजग्राहकांनी घरबसल्या तब्बल २,२२० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला.

नागपूर जिह्यातील बुटीबोरी, कॉग्रेसनगर आणि सिव्हील लाईन्स तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विभागात ऑनलाईन वीज भरणा करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक असून परिमंडलात सर्वत्र ऑनलाईन वीज भरण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाइन बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅंकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळविण्यासाठी संबंधित ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी नसावी; तसेच वीजबिलांचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काउंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे.वेबसाइट, ऍपचा वापर - महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाइन बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट; तसेच जून २०१६ पासून मोबाईल ऍपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डसचा पर्याय उपलब्ध केला आहे. भरलेल्या रकमेच्या पावतीचा तपशीलही सोबत मिळत आहे.ऑनलाइन झाले निःशुल्क - क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइनचे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहेत. याआधी नेटबॅंकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते; परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅंकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइनद्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे.

टॅग्स :electricityवीज