शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दिल्लीपेक्षा नागपुरात जास्त ध्वनिप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 10:43 IST

प्रदूषणाच्या बाबतीत कायम चर्चेत राहणारी देशाची राजधानी दिल्लीला ध्वनिप्रदूषणामध्ये राज्याची उपराजधानी नागपूरने मागे टाकले आहे.

ठळक मुद्देनीरीच्या ‘नॉईज ट्रॅकर अ‍ॅप’चे आकडे दिवाळीच्या काळात ओलांडली पातळी

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषणाच्या बाबतीत कायम चर्चेत राहणारी देशाची राजधानी दिल्लीला ध्वनिप्रदूषणामध्ये राज्याची उपराजधानी नागपूरने मागे टाकले आहे. दिवाळीच्या काळात फोडलेल्या फटाक्यांमुळे यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान राजधानी दिल्लीत कमाल ६८.१ डेसिबल ध्वनिची नोंद करण्यात आली होती, मात्र याच काळात नागपुरात ८०.८ ते ८१ डेसिबलची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने तयार केलेल्या ‘नॉईज ट्रॅकर अ‍ॅप’द्वारे ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.आवाजाचा मानवांसहित संपूर्ण वातावरणावर होणाऱ्या परिणामांची नोंद करण्यासाठी नीरीच्या संशोधकांनी तयार केलेले हे ‘नॉईज ट्रॅकर अ‍ॅप’ नीरीच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त संचालक डॉ. राकेश कुमार यांच्याहस्ते सादर करण्यात आले होते. या अ‍ॅपद्वारे शहरातील काही ठराविक ठिकाणी ध्वनीची नोंद घेण्यात आली होती. यातील रामनगर चौकामध्ये अ‍ॅपद्वारे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत नोंदविलेल्या आकड्यानुसार ८० ते ८१ डीबी ध्वनी नोंदविण्यात आला, जो सामान्यपेक्षा तब्बल २५ ते ३५ डीबी अधिक होता. देशात एवढ्याच ध्वनिप्रदूषणाची नोंद पश्चिम बंगालच्या सुभाष मेट्रो स्टेशन चौकात करण्यात आली. विशेष म्हणजे दिवाळीच्या काळातच यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. साधारणत ध्वनीची सहनीय क्षमता सार्वजनिक क्षेत्रात (बाजार, चौक, रोड) ५५ डीबी तर निवासी क्षेत्रात ४५ डीबी एवढी असते. त्यास नॉईज अँबियंट लेव्हल असे संबोधले जाते. यापेक्षा अधिक ध्वनिप्रदूषण म्हणून गणले जाते. राजधानी दिल्लीत या काळात सर्वात कमी म्हणजे ६८.१ डीबी नोंदविण्यात आले. त्यामुळे आता वायुप्रदूषण वाढत असलेल्या नागपुरात ध्वनिप्रदूषणाबाबतही चिंता करण्याची वेळ आली आहे.ध्वनिप्रदूषणासह वायुप्रदूषणाचे आकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समोर आले आहेत. वायुप्रदूषणाचा विचार केल्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे दिवाळीच्या दिवशी सिव्हील लाईन्सच्या परिसरात अधिक प्रदूषित हवेची नोंद करण्यात आली. रात्री १२ वाजतानंतर एअर क्वालिटी इंडेक्स ३५३ वर पोहचला होता. देशात वायुप्रदूषणाबाबत दोन शहराची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. नीरीने ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी अ‍ॅप तयार केले आहे. आता वायुप्रदूषण योग्य रुपाने मोजण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे.

पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणामध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले तर त्याचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. त्यामुळे पक्ष्यांचे अंडी देण्याचे प्रमाण घटते. त्यांच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होतो. ध्वनिप्रदूषण हे हृदयाच्या रुग्णांसाठीही घातक ठरणारे आहे. त्यामुळे याबाबत जागरूकता आणण्यासाठीच नॉईज ट्रॅकर अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप नि:शुल्क डाऊनलोड केले जाऊ शकते व येथील नोंदणीच्या आधारावर नागरिक आपली तक्रारही नोंदवू शकतात. हे अ‍ॅप भारतासह कॅनडा, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, थायलंड आदी देशामध्येही डाऊनलोड केले जाऊ शकते. यामध्ये एखाद्या व्यक्तीने कुठल्याही ठिकाणचा डेटा नोंद केला असल्यास तो त्या लोकेशनमध्ये सुरक्षित होतो. यामुळे एखाद्या एजन्सीद्वारे लाखो रुपये खर्च करून ध्वनिप्रदूषणाचे आकडे जाणण्याची गरज पडणार नाही. या अ‍ॅपद्वारे ध्वनिप्रदूषणाबाबत लोकही अपडेट होतील. याच आकड्यांच्या आधारे संबंधित संस्थेकडे तक्रार नोंदविली जाऊ शकेल.- सतीश लोखंडे, सिनियर टेक्निकल ऑफिसर, नीरी

टॅग्स :pollutionप्रदूषण