शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वेब सिरियल्समुळे नैतिकतेची एैसीतैसी : हायकोर्टात जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:13 IST

अश्लीलता, हिंसकता व अभद्र संवादांनी भरलेल्या वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची एैसीतैसी होत असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नवीन जनहित याचिकेत करण्यात आला आहे. अ‍ॅड. दिव्या गोंटिया यांनी ही याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देकुणाचेही नियंत्रण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : अश्लीलता, हिंसकता व अभद्र संवादांनी भरलेल्या वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची एैसीतैसी होत असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नवीन जनहित याचिकेत करण्यात आला आहे. अ‍ॅड. दिव्या गोंटिया यांनी ही याचिका दाखल केली आहे.सध्या वेब सिरियल्स अनियंत्रित आहेत. त्यांना पारंपरिक माध्यमांप्रमाणे कोणतीही मार्गदर्शकतत्त्वे लागू नाहीत. त्यामुळे नेटफ्लिक्स, एएलटी बालाजी, यूट्यूब, हॉटस्टार, अ‍ॅमॅझॉन प्राईम व्हिडिओ, वूट, विमियो इत्यादी वेबसाईटवर नवनवीन सिरियल्स प्रसारित केल्या जात आहेत. सेन्सॉरशिप नसल्यामुळे सिरियल्स मूळ स्वरूपात पे्रक्षकांना दाखविल्या जातात. बहुतांश वेब सिरियल्स नग्नता, अश्लील संवाद व हिंसक प्रसंगांनी भरलेल्या असतात. रंजकता वाढविण्यासाठी महिलांना चरित्रहीन दाखविले जाते. धार्मिक भावना भडकविणारे प्रसंग दाखविले जातात. राजकीय नेत्यांना शिविगाळ केली जाते. गेल्या काही महिन्यांत प्रचंड लोकप्रियता वाढल्यामुळे मोठमोठ्या माध्यम कंपन्या वेब सिरियल्सची निर्मिती करीत आहेत असे याचिकाकर्तीने विविध वेब सिरियल्सची नावासह उदाहरणे देऊन याचिकेत नमूद केले आहे.वेब सिरियल्सचा सर्वाधिक दुष्परिणाम तरुण पिढीच्या मानसिकतेवर पडत आहे. वेब सिरियल्सने तरुण पिढीच्या डोक्यात घर केले आहे. परिणामी, यासंदर्भात तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रसारण संहितेद्वारे इलेक्ट्रॉनिक मीडिया तर, प्रेस कौन्सिलद्वारे प्रिंट मीडिया नियंत्रित केला जातो. वेब सिरियल्सकरिता असे नियंत्रक नाहीत. त्यामुळे या माध्यमाचा दुरुपयोग केला जात आहे असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालय, विधी व न्याय मंत्रालय आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर येत्या १० आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. अ‍ॅड. श्याम देवानी याचिकेचे कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयYouTubeयु ट्यूब