शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गली मे आज चाँद निकला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:11 IST

बहारदार शब्द सूरांच्या, चंद्र-चांदण्यात विशेष बहरणाऱ्या ‘यू सजा चाँद’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वरधूनी संस्थेतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रोत्यांसाठी हा खास नजराना होता.

ठळक मुद्देस्वरधुनीतर्फे कोजागिरी विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : बहारदार शब्द सूरांच्या, चंद्र-चांदण्यात विशेष बहरणाऱ्या ‘यू सजा चाँद’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वरधूनी संस्थेतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रोत्यांसाठी हा खास नजराना होता.गायिका अंशु बुटी व वंदना देशभ्रतार यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात नवोदित व हौशी गायकांनी सुरेल गायनातून कोजागिरीच्या चंद्राच्या मधूर गंध स्पर्शाची अनेक रोमांचक गीते यावेळी सादर केली. अंशू व वंदना यांच्यासह अंशुका काळे, पलक आर्या, सुनीता कळंबे, प्रशांत वालिकर, अशोक बागुल, गोपाल अय्यर, गणेश चव्हाण, स्वप्नील गोडे, दिलीप गाडवे या सहभागी गायकांचा समावेश होता. चंद्र-चांदण्यांच्या प्रकाशात प्रेमिकांच्या भावनांना येणारा पूर तर दुसरीकडे विरही जनांना व्याकुळ करणाऱ्या भावनांनी सजलेल्या सुंदर गीतांनी सिनेसंगीताचे दालन सजले आहे. त्यातील काही निवडक गीते गायक कलावंतांनी सादर केली.‘गली मे आज चाँद निकला..., दिल की नजर से..., निले निले अंबर पे चाँद जब आये..., चाँद शिफारीश जो करता हमारी..., रुक जा रात ठहर जा रे चंदा..., चेहरा है या चाँद खिला..., ये रात भीगी भीगी..., यू सजा चाँद...’ अशी काही गोड गाणी रसिकश्रोत्यांना भावविभोर करणारी ठरली. निवेदन सुचेता चव्हांडके यांचे होते. यावेळी राजेंद्र चोपडे, सुनीता कांबळे, हर्षल पराते, लकी हे तांत्रिक सहयोगी होते. आयोजनात अभिजित पोफळे व आशित बुटी यांचा सहभाग होता.

टॅग्स :musicसंगीतcultureसांस्कृतिक