शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:36 IST

वारंवार होणारे अतिक्रमण व नुकसान टाळण्यासाठी हेरिटेज कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण घालणे आवश्यक आहे, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष मांडली. तसेच, यासंदर्भात १९ जून रोजी महानगरपालिकेला पत्र पाठविल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांची भूमिका : उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वारंवार होणारे अतिक्रमण व नुकसान टाळण्यासाठी हेरिटेज कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण घालणे आवश्यक आहे, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष मांडली. तसेच, यासंदर्भात १९ जून रोजी महानगरपालिकेला पत्र पाठविल्याची माहिती दिली.निराश्रित व्यक्ती ऊन व पावसापासून वाचण्यासाठी कस्तूरचंद पार्कमधील स्मारकात येऊन राहतात. हाकलून लावल्यानंतरही ते परत-परत येतात. त्यांच्यापासून स्मारकाला धोका निर्माण होऊ नये याकरिता कुंपण घालणे आवश्यक आहे. स्मारकावर लक्ष ठेवण्यासाठी सदर पोलीस सतत गस्त घालत असतात. भविष्यातही नियमित गस्त घातली जाईल. अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेला मागणीनुसार पोलीस संरक्षण पुरविले जाते. यापुढेही मनपा अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी दिली.जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तमान परिस्थितीची माहिती दिली. कस्तूरचंद पार्कवर मेट्रो रेल्वेशी संबंधित विविध कामे सुरू आहेत. महानगरपालिकाही विकासकामे करीत आहेत. तसेच, जॉगिंग व सायकल ट्रॅक आणि वृक्षारोपणाकरिता सोलर इंडस्ट्रीज इंडियाला परवानगी देण्यात आली आहे असे न्यायालयाला सांगण्यात आले. याविषयी न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी ३० जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क