शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाला महिन्याचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 11:12 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला महिन्याचा कालावधी लागणार असून, यावर राज्य शासन निर्णय घेणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासन निर्णय घेणारमिहानमधील ५० टक्के जागा कंपन्यांना

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला महिन्याचा कालावधी लागणार असून, यावर राज्य शासन निर्णय घेणार आहे. मिहानमधील ५० टक्के जागा कंपन्यांना दिली आहे. एव्हिएशन क्षेत्रातील सहा कंपन्यांचे बांधकाम सुरू असून, मिहानचा विकास वेगाने होत असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी लोकमतशी बोलताना दिली.

यावर्षी १० कॉकपीट तयार होणाररिलायन्सच्या प्रकल्पात फाल्कन-२००० या बिझनेस जेटसाठी लागणारे कॉकपीट तयार होऊन फ्रान्सला पाठविण्यात आले आहे. यावर्षी १० कॉकपीट आणि सुटेभाग तयार होणार आहे. प्रकल्पात दोन वर्षांत विमानांची प्रत्यक्ष निर्मिती होईल. कंपनीने जमीन दिल्यापासून सहा महिन्यात बांधकाम पूर्ण केले. या ठिकाणी नागपुरातील तंत्रज्ञ काम करीत आहेत. १२ वी पास विद्यार्थ्यांना गरजेनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. रिलायन्सच्या पलीकडे नवीन टॅक्सीवेचे काम सुरू आहे.

पतंजलीचे प्रत्यक्ष उत्पादन सहा महिन्यांतमिहानमधील पतंजली प्रकल्पात सर्वाधिक युवकांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प उभारणीचे काम वेगात आहे. मशीनरी लावण्यात आली आहे. तीन महिन्यात ट्रायल रन आणि सहा महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे.

बांधकाम सुरू करण्याची परवानगीमिहानमध्ये एमएडीसीतर्फे कंपन्यांना बांधकाम करण्यासाठी २४ तास ते १५ दिवसांत परवानगी देण्यात येते. १५ दिवसांपर्यंत परवानगी न मिळाल्यास कंपनीला बांधकामाला सुरुवात करता येते. लहान प्लॉटला एक वर्ष आणि मोठ्या प्लॉटला आठ वर्षांपर्यंत बांधकामाची मुभा आहे.

एव्हिएशन क्षेत्रातील १० कंपन्यामिहानमध्ये एव्हिएशन क्षेत्रातील १० कंपन्यांनी जागा विकत घेतली असून, सहा कंपन्यांची कामे सुरू आहेत. एअर इंडियाचा एमआरओ सुरू आहे. याशिवाय इंदमार, रिलायन्स, थॅलिस टारगिस अ‍ॅण्ड गिलॉर्ड या कंपन्यांची कामे वेगात सुरू आहे. याशिवाय लुपिन, झिम लेबॉरेटरीज, आर्कोलाईफ सायन्स या फार्मा कंपन्यांनी जागा घेतली आहे. लुपिनचे उत्पादन सुरू आहे. सूरज आयकेअरचे आणि दोन अन्य कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. रुग्णांना लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचे मिहानमध्ये उत्पादन होणार आहे. त्याकरिता एका कंपनीचे २० लाख चौरस फुटात बांधकाम सुरू आहे. देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी मिहानमध्ये येणार असून, ५० एकर जागा दिली आहे. सर्व प्रकारची आयटी उत्पादने कंपनी मिहानमध्ये तयार करणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर