लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरवीत परतीच्या पावसाने गुरूवारी रात्रीपासून विदर्भात हजेरी लावली. गुरुवारी रात्रीपासूनच गोंदिया जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरमधील धान पिकाला दिलासा मिळाला आहे.यवतमाळ शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. तब्बल २० दिवसांच्या उघाडानंतर पाऊस आल्याने खरिपातील कपाशीला संजीवनी मिळालीवर्धा शहरासह सेलू आणि परिसरात परतीच्या मान्सूनने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र आजचा पाऊस जलशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ करू शकला नसल्याने वर्धा जिल्हयावर कोरड्या दुष्काळाचे सावट असल्याचे सांगण्यात येतेभंडारा जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. भातपिकासाठी पावसाची गरज होती. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. हलक्या प्रतीचे भातपिक लोंबीवर आले असल्याने लोंबी भरण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. पाऊस सुरू झाल्याने पिक चांगले येईल असे शेतकरी बांधवांना वाटते आहेनागपुरात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. दुपारी १ च्या सुमारास नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
परतीच्या पावसाची विदर्भात सर्वदूर दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:27 IST
हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरवीत परतीच्या पावसाने गुरूवारी रात्रीपासून विदर्भात हजेरी लावली.
परतीच्या पावसाची विदर्भात सर्वदूर दमदार हजेरी
ठळक मुद्देधान पिकांना दिलासा