शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मान्सून पुन्हा सक्रिय, ४७.९ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 22:19 IST

नागपुरात शनिवारी रात्री पावसाच्या सरी पडल्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत नागपुरात २.५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देकमी दाबाचा पट्टा तयारदुपारी वातावरण बदलले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंगालच्या खोऱ्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून नागपूरसह विदर्भातील अनेक भागात गेल्या २४ तासात पाऊस झाला. नागपुरात शनिवारी रात्री पावसाच्या सरी पडल्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत नागपुरात २.५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली तर सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ४५.४ मिमी इतका पाऊस झाला. म्हणजेच गेल्या २४ तासात नागपुरात ४७.९ मिमी इतका पाऊस झाला.हवामान विभागानुसार बंगालच्या खोऱ्यात तयार झालेल्या कमी दाबामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, ओरिसा व केरळसह मध्य भारतातील अनेक भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अधून-मधून पाऊस होत राहील. यावर्षी नागपुरात जूनपासूनच मान्सून सक्रिय झाला होता. मध्यम व कमी गतीने पाऊस सातत्याने सुरु होता. परिणामी १ जून पासून २० सप्टेंबरपर्यंत नागपुरात एकूण ११९८.६ मिमी इतका पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस होत नाही. तरीही मान्सून परत आल्याने दोन ते तीन दिवस चांगला पाऊस होऊ शकतो. नागपुरात गेल्या २४ तासात अधूनमधून पाऊस सुरू आहे. त्यामुळे कमाल तापमान १.६ डिग्रीने खाली घसरून ३३.७ डिग्री सेल्सियसवर पोहोचले आहे. तर किमान तापमानही १.१ डिग्रीने खली घसरून २३.२ डिग्री सेल्सिअसवर आलेविदर्भाची स्थिती नाजूकविदर्भात नागपूरशिवाय बुलडाणा येथे सरासरी ३ तर वाशिममध्ये सरासरी ११ टक्के अधिक पाऊस झाला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. अमरावतीमध्ये सरासरीपेक्षा २१ टक्के, अकोला २७, यवतमाळ २५, चंद्रपूर १८, गडचिरोली १०, वर्धा ११, गोंदिया ८ आणि भंडारामध्ये ४ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात १ जूनपासून २० सप्टेंबर दरम्यान ८०३.२ मिमी इतका पाऊस झाला. तो सरासरीपेक्षा ११ टक्के कमी आहे. याच काालावधीत विदर्भात सरासरी ८०५.४ मिमी इतका पाऊस होतो. यावेळी मराठवाड्यात सरासरीपेक्षा २८ टक्के, मध्य महाराष्ट्रात ३२ टक्के आणि कोकणात २५ टक्के अधिक पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊस