लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकर असलेल्या मोनिका सभरवाल यांनी जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविला आहे. थायलंड येथील नामांकित कंपनीकडून आयोजित ‘मिसेस इंडिया वेस्ट वर्ल्डवाईड’ स्पर्धेत त्या उपविजेत्या ठरल्या. तर त्यांना ‘मिसेस एन्ट्रप्रेनर’चादेखील मान मिळाला. ही स्पर्धा ग्रीस व नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेचा प्राथमिक टप्पा हा ग्रीस येथे झाला तर नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे अंतिम फेरी पार पडली. यावेळी जगभरातून ८७ स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. यात मोनिका सभरवाल यांनी बाजी मारली. मोनिका सभरवाल या ‘आयटी इंजिनियर’ आहेत.सोबतच त्या महिला सक्षमीकरण मोहिमेशी जुळल्या आहेत. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी पती अर्पित सभरवाल, सासरे टिटूभाई सभरवाल यांना दिले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या सहकार्याने व प्रोत्साहनामुळे मला यश मिळू शकले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मोनिका सभरवाल यांना सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:32 IST
नागपूरकर असलेल्या मोनिका सभरवाल यांनी जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविला आहे.
मोनिका सभरवाल यांना सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट
ठळक मुद्दे‘मिसेस इंडिया वेस्ट वर्ल्डवाईड’मध्ये उपविजेत्या