शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

मनी सर्जिकलने उतरवली मद्यालयाची झिंग

By admin | Updated: November 14, 2016 02:42 IST

काळे धन जमविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या मनी सर्जिकल स्ट्राइकचा उपराजधानीतील

मद्यपींना कार्डसोबत ‘क्रेडिटची’ सुविधा : गर्दी वाढवण्यासाठी ‘लव्ह पेग’ मोफतनरेश डोंगरे  नागपूर काळे धन जमविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या मनी सर्जिकल स्ट्राइकचा उपराजधानीतील वाईन शॉप आणि बीअर बार मालकांना चांगलाच फटका बसला आहे. ५००, १०००च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने ग्राहकांनी मद्यालयांकडे पाठ फिरवली. त्यामुळे झिंग उतरलेल्या अनेक मद्यालय मालकांनी गर्दी वाढवण्यासाठी मद्यपींना डेबिट कार्डसह क्रेडिटचीही सुविधा दिली आहे. एवढेच नव्हे तर बिल भरताना मोफत ‘लव्ह पेग’ देणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. या अनपेक्षित घोषणेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. काळे धन साठवणाऱ्यांसह छोटेमोठे दुकानदार, सर्वच व्यापारी प्रतिष्ठान आणि सर्वसामान्यांमध्येही मनी सर्जिकल स्ट्राईकने हाहा:कार निर्माण केला. बँका, एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागल्या. ५०० अन् १०००ची नोट स्वीकारण्यास चोहोबाजूने नकार मिळत असल्याने औषध, उपचार, प्रवास करणे अवघड झाले आहे. रोजच्या अत्यावश्यक चीजवस्तू मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांची धावपळ सुरू आहे. बँकेतून मिळालेली दोन हजाराची नोट स्वीकारण्यास व्यापारी तयार असले तरी अनेक व्यापारी सुटी रक्कम नाही असे सांगून नागरिकांना वेठीस धरत आहे. परिणामी रोजचे जेवण तयार करणेही कठीण झाले आहे. थकून भागून मद्यालयाकडे वळणाऱ्यांना बार, वाईनशॉपवाले ५०० आणि १०००ची नोट स्वीकारण्यास नकार देऊ लागले. त्यामुळे मद्यालयातील गर्दी ओसरली आहे. अनेक मद्यालयांचा धंदा पाच ते दहा टक्क्यांवर आला आहे. रोज १०० ते २०० ग्राहक ज्या बार, वाईन शॉपमध्ये येतात, तेथे आता दहा ते पंधराच ग्राहक येत असल्यामुळे अनेक मद्यालयाच्या संचालकांची नशा उतरली आहे. त्यामुळे हादरलेल्या मद्यालय संचालकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या आहेत. —आॅर्केस्ट्रात उधळा पाचशे, हजार !काहीजण आपल्या नियमित ग्राहकांना मेसेज पाठवित आहेत. बिलाची चिंता करू नका, मद्याचा आस्वाद घ्यायला या. डेबीट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही बिल देऊ शकता. दोन्ही कार्ड नसेल तर बिल ‘उधार’ ठेवले जाईल, अशीही ‘उदार’ भूमिका मेसेजमधून काहींनी स्पष्ट केली आहे. मद्यपींचे बिल ५००, १०००ची नोट स्वीकारून चुकता करण्यास नकार देणाऱ्या एका आॅर्केस्ट्रा बारच्या संचालकाने विशिष्ट मद्यपींना आॅर्केस्ट्रात बसून ५००, १०००ची नोट उधळण्याची मुभा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. बहुतांश बार मालकांनी मद्यासोबत चखना, गाजर, काकडी, चटणी आणि बॉयल पिनट तसेच थोडासा चिवडा मोफत देणेही सुरू केल्याची माहिती आहे. सीताबर्डीत एका बारमालकाने रोख बिल देणाऱ्या ग्राहकाला काऊंटरवर ‘लव्ह पेग’ (स्मॉल पेग) मोफत देणे सुरू केले आहे. अनेक वाईन शॉपवाल्यांनी चिवडा, शेव पॅकेट मोफत देणे सुरू केले आहे. मद्यालयातील वर्दळ वाढविण्यासाठी सुरू झालेल्या या योजनांची मद्यपींमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.