शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 20:51 IST

एटीएममध्ये तात्पुरता बिघाड करून एका भामट्याने १ लाख ६७ हजार रुपये लंपास केले. १२ सप्टेंबरच्या सकाळी घडलेली ही अफलातून चोरीची घटना सोमवारी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देसक्करदऱ्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एटीएममध्ये तात्पुरता बिघाड करून एका भामट्याने १ लाख ६७ हजार रुपये लंपास केले. १२ सप्टेंबरच्या सकाळी घडलेली ही अफलातून चोरीची घटना सोमवारी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली.सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद नगर द्वारका कॉम्प्लेक्स आहे. येथील पहिल्या माळ्यावर एसबीआयचे एटीएम आहे. १२ सप्टेंबरच्या सकाळी ६ ते ७.४६ या वेळेत एक भामटा एटीएम मध्ये आला. त्याने कार्ड स्वाईप केले आणि आतमधून १ लाख ६६ हजार रुपये काढून घेतले. बँकेचे कर्मचारी सोमवारी एटीएममध्ये रक्कम जमा करण्यासाठी आले. हिशेब केला असता त्यात १ लाख ६६ हजाराची रक्कम कमी आढळली. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक आरोपी वारंवार कार्ड स्वाईप करून पेचकस सारखी वस्तू कॅश कटर मध्ये टाकून रक्कम काढत असल्याचे दिसून आले. रक्कम बाहेर येत असतानाच आरोपी कॅश कटरमध्ये पेचकस टाकत होता परिणामी व्यवहार पूर्ण होत नव्हता. त्या तांत्रिक बिघाडामुळे आरोपीला वारंवार रक्कम काढणे शक्य होत होते. हे लक्षात आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सक्करदरा पोलिसांशी संपर्क साधला. चौकशीनंतर बँकेतर्फे श्रीधर भाऊरावजी केदार शिवनगर दुर्गापुर यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :atmएटीएमtheftचोरी