शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत पास करण्यासाठी मागितले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:00 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागाच्या विभागप्रमुखांनी परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केल्याची व मानसिक त्रास दिल्याची तक्रार एका माजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्याने अधिष्ठात्यांकडे केली आहे. या तक्रारीवर अधिष्ठात्यांनी संबंधित विभागप्रमुखांना स्पष्टीकरण मागितले आहे.

ठळक मुद्देपीजी विद्यार्थ्याचा आरोप : मेयोचे नेत्ररोग विभाग आले चर्चेत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागाच्या विभागप्रमुखांनी परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केल्याची व मानसिक त्रास दिल्याची तक्रार एका माजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्याने अधिष्ठात्यांकडे केली आहे. या तक्रारीवर अधिष्ठात्यांनी संबंधित विभागप्रमुखांना स्पष्टीकरण मागितले आहे.तक्रारकर्ता विद्यार्थी हा २०१३ ते २०१६ दरम्यान मेयोमध्ये होता. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याने नेत्ररोग हा विषय निवडला होता. दाखल केलेल्या त्याच्या तक्रारीनुसार, नेत्ररोग विभागाच्या प्रमुखांनी तीन वर्षांच्या कार्यकाळात मानसिक त्रास दिला. परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केली. प्रत्येक पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मानसिक व आर्थिक पिळवणूक ते करतात. मेडिकल बोर्डाच्या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार झाला आहे. लेक्चर व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे पद भरताना भ्रष्टाचार करतात. ंआंतरवासिता(इन्टर्न)मुलींना आपल्यासमोर बसवून ठेवतात. जाणीवपूर्वक शल्यचिकित्सागृह बंद ठेवण्यास लावतात. यामुळे या विभागाच्या सर्वात कमी शस्त्रक्रिया होतात. माझ्या परीक्षेच्या एक दिवसआधी परीक्षेत पास व्हायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे धमकाविले होते. या भ्रष्ट विभागप्रमुखाची चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्याने केली आहे.प्राप्त माहितीनुसार, या विद्यार्थ्याने २०१६ मध्ये अशीच तक्रार मुख्य सचिव आारोग्य वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केली होती. परंतु कुठलीच कारवाई किंवा चौकशी झाली नव्हती. आता पुन्हा तक्रार अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना मेल करून केली आहे. त्यांनी तक्रारीला गंभीरतेने घेतले आहे. विभागप्रमुखांना मागितले स्पष्टीकरणमाजी विद्यार्थ्याची तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाच्या प्रमुखांना स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांचे स्पष्टीकरण आल्यानंतरच पुढे काही बोलता येईल.डॉ. अजय केवलियाअधिष्ठाता, मेयो

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Corruptionभ्रष्टाचार