शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात निशांत-राधे टोळीवर मोक्का

By admin | Updated: May 6, 2016 03:07 IST

खंडणी वसुली आणि हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचपावलीतील कुख्यात निशांत-राधे टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.

१५ वी कारवाई : आणखी काही टोळ्या टप्प्यात नागपूर : खंडणी वसुली आणि हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचपावलीतील कुख्यात निशांत-राधे टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. उपराजधानीत यंदाची ही मोक्काची १५ वी कारवाई आहे, अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. या टोळीत निशांत ज्ञानेश्वर गौर (वय २७, लालगंज), राधेश्याम ऊर्फ तंट्या ऊर्फ राधे शिवदास खोब्रागडे (वय २२, रा. गंगाबाई घाट, स्वीपर कॉलोनी), शुभम ऊर्फ भुऱ्या विनायक बिनेकर (वय १९, रा. तांडापेठ), निखिल सुरेश जांभुलकर (वय २३, रा. भानखेडा), विक्की रामदास बावनकर (वय २४, कावरापेठ, बाबानगर) या गुंडांचा समावेश आहे. पाचपावलीतील व्यापारी, कारखानदार, दुकानदार यांना शस्त्राचा धाक दाखवून ही टोळी खंडणी वसूल करीत होती. दिवसाढवळ्या घातक शस्त्रे हातात घेऊन फिरायचे आणि दहशत निर्माण करायची. खंडणी देण्यास नकार देणाऱ्यांना मारहाण करायची, त्यांना लुटायचे, प्राणघातक हल्ले करायचे, अशी या टोळीतील गुंडांची कार्यपद्धत आहे. सलवार सूटचा कारखाना चालविणाऱ्या अजादुल खान यांना या गुंडांनी दोन हजारांची खंडणी मागितली होती. खान यांच्याकडे तांडापेठमधील संजय शामराव खापेकर (वय ३४) हा तरुण काम करीत होता. खापेकरने या टोळीला खंडणी वसुलीसाठी विरोध केल्यामुळे राधे आणि निशांत तसेच त्यांच्या गुंड साथीदारांनी १६ एप्रिलला संजय खापेकरची भीषण हत्या केली होती. या गुन्ह्यानंतर टोळीतील गुंडांना अटक करण्यात आली. आर्थिक लाभासाठी टोळीतील गुंडांनी संघटितपणे अनेक गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी दिले. त्यानुसार टोळीतील गुंडांवर मोक्का लावण्यात आल्याचे उपायुक्त संजय लाटकर यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)उत्तर नागपुरात प्रचंड दहशतया टोळीची उत्तर नागपुरात प्रचंड दहशत आहे. टोळीप्रमुख निशांत गौर याच्याविरुद्ध २०११ पासून तब्बल १० गुन्हे दाखल झाले. त्याने तहसील, लकडगंज, हुडकेश्वर आणि पाचपावलीत गुन्हे केले असून, सीताबर्डी आणि सदरमध्ये दरोडा, जबरी चोरीचेही तीन गुन्हे केले आहेत. तर, दोन वर्षांपासून राधे ऊर्फ तंट्या फारच आक्रमक झाला. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, लुटमारसह सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. अन्य आरोपींवरदेखील गुन्हे असून, एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. आवळे टोळीवरही मोक्का बड्या घरचे तरुण, व्यापारी अन् चांगल्या पगाराच्या नोकरदारांना तरुणींच्या माध्यमातून फसवून बलात्काराचा आरोप लावून त्यांच्याकडून सुनियोजितपणे लाखोंची खंडणी उकळणाऱ्या आवळे टोळीवरही मोक्काची कारवाई केली जाणार आहे. तशी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती उपायुक्त लाटकर यांनी पत्रकारांना दिली. या टोळीने एका तरुण रेल्वे कर्मचारी तसेच अनेकांना तरुणींच्या माध्यमातून फसवून लाखोंची खंडणी उकळली आहे. या टोळीच्या जाळ्यात अडकलेल्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहनही लाटकर यांनी केले.