शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

घातक गोलंदाजी करत मोहम्मद शमीने बुकींचेही कंबरडे मोडले

By नरेश डोंगरे | Updated: November 16, 2023 21:03 IST

तीन दिवसांनंतर सुरू झाली होती दुकानदारी

नरेश डोंगरेनागपूर : घातक गोलंदाजी करत मोहम्मद शमीने केवळ न्युझिलंडच्या संघाचेच नव्हे तर शेकडो बुकींचेही कंबरडे मोडले. बुधवारी पार पडलेल्या आयसीसी वन-डे विश्वचषकाच्या सेमिफायनल मॅचमध्ये अनेक बुकींना कोट्यवधींचा फटका बसला. भारतीय संघाने एकीकडे धावांचा पाऊस पाडत सेमिफायनल जिंकले तर दुसरीकडे नकळतपणे नवख्या बुकींचे खिसे अक्षरश: फाडून काढले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी भारताविरुद्ध नेदरलँड्समध्ये सामना झाला. हा सामना भारतीय संघ हमखासपणे जिंकणार, हे सर्वांनाच माहिती होते. अर्थात् भारताच्या जिंकण्यावरच सटोडे रक्कम लावणार असल्याने बहुतांश बड्या बुकींनी आपले शटर डाऊन केले होते. रविवार, सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस ते डाऊनच होते.

कोट्यवधी रुपये खिशात कोंबल्यानंतर बुकींनी धडाक्यात लक्ष्मीपूजन केले. त्यानंतर बुधवारी नव्या जोमाने बुकींनी आपला पाना उघडला. सामना सुरू होत असताना क्रिकेट मॅचच्या सट्टाबाजारात ओपनिंग रेट होता ३९-४१ चा, लगेच तो ३६-३८ वर आला आणि भारतीय संघाने डावाचा डोंगर उभा केल्याने बुकींच्या खिशांवरचा भार चांगलाच वाढला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी डाव खेळल्याने खिसे फाटणार याची कल्पना आल्याने बुकींनी वेगवेगळी डावबाजी करून सट्टेबाजांना थोपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहम्मद शमीने घातक गोलंदाजी करून न्युझिलंडच्या संघालाच नव्हे तर बुकींनाही गारद केले. गारद होणाऱ्या बुकींमध्ये नवख्या बुकींची संख्या जास्त आहे.तिकडे हिशेब चुकता, ईकडे थकला

गेल्या वेळी अर्थात २०१९ च्या विश्व चषकाच्या सेमिफायनलमध्ये न्युझिलंडने भारतीय संघाला हरवून बाहेरची वाट दाखवली होती. यावेळी भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये न्युझिलंडची धुळधाण उडवत गेल्या वेळीचा हिशेब चुकता केला. क्रिकेट विश्वातील हा हिशेब चुकता झाला असला तरी बुकींच्या बाजारात शेकडो कोटींच्या लगवाडी खयवाडीचा हिशेब थकला असून तो फायनल संपल्यानंतर चुकवला जाणार आहे.प्रबळ दावेदाराच्या भावाकडे लक्ष

विश्व चषक पटकविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकी बाजारात प्रारंभी 'मेन ईन ब्ल्यू'ला ९० पैसे एवढा जास्त भाव होता. मात्र, सलग प्रत्येक सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाने बुकी बाजाराचे गणित चुकवले. बुधवारच्या सामन्यानंतर विश्व चषकाचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघ पुढे आला आहे. आता बुकींकडून भारतीय संघाला कोणता भाव दिला जातो, त्याकडे सटोड्यांचे लक्ष लागले आहे.