शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पराभव समोर दिसत असल्याने मोदींचा तोल गेला : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:00 IST

पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल गेला आहे. ते वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने ते आता धमक्या देत फिरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

ठळक मुद्देमुद्देच नसल्याने धमक्या देत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पराभव समोर दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तोल गेला आहे. ते वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने ते आता धमक्या देत फिरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.भंडारा-गोंदिया लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पाटील नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पाच वर्षांत काय केले त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. याकरिता ते पवारांना लक्ष्य करीत आहेत तर दुसरीकडे हिंदुत्वाची हाक देत आहेत. आजवर पंतप्रधान आपल्या भाषणात त्यांनी काय केले आणि भविष्यात काय करणार हे सांगत होते. परंतु मोदी फक्त इतरांची उणीदुणी काढत फिरत आहेत. त्यांनी वेगळाच पायंडा पाडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ते शेतमालाला दुप्पट हमी भाव देऊ, युवकांना रोजगार देऊ, महागाई, भ्रष्टाचार रोखू अशा भरमसाट घोषणा मागील निवडणुकीच्या पूर्वी केल्या होत्या. यापैकी काहीच केले नाही. त्यांचे महाराष्ट्रातील चेलेही तेच काम करीत आहेत. मोदींच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे दिसून येते, असेही जयंत पाटील म्हणाले.गरीबांना ७२ हजार रुपये देण्याची घोषणा ही व्यवहारी आहे. रघुराम राजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतरच ही घोषणा करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांची वाटही बघितली. मात्र त्यांनी नकार दिला. त्यांच्या एकाही उमेदवाराला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. एकूणच परिस्थिती झपाट्याने काँंग्रेस आघाडीच्या बाजूने अनुकूल होत असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, अनिल अहीरकर, बाबा गुजर, ईश्वर बाळबुधे, प्रवीण कुंटे, शब्बीर विद्रोही आदी उपस्थित होते.... म्हणून पवारांवर मोदींची टीकाभाजपविरोधी महाआघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. सर्वांना एकत्र आणण्याचे कसब त्यांच्यात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करीत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJayant Patilजयंत पाटीलbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019