शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी आता दलित मतांचा विचारही करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:28 IST

२०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित मतांचा विचारही करू नये. कारण जोवर मी जिवंत आहे दलितांचे एकही मत मोदी किंवा भाजपला मिळू देणार नसल्याचे वक्तव्य गुजरातमधील काँग्रेस समर्थित आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.

ठळक मुद्देजिग्नेश मेवानी : संयुक्त नेतृत्वाची आघाडी पुढे जाईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित मतांचा विचारही करू नये. कारण जोवर मी जिवंत आहे दलितांचे एकही मत मोदी किंवा भाजपला मिळू देणार नसल्याचे वक्तव्य गुजरातमधील काँग्रेस समर्थित आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.रिपब्लिकन युथ फेडरेशन व रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अमृत भवन येथे मानव अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला उद्घाटक म्हणून आमदार जिग्नेश मेवानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बबनराव तायवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून रमेश जीवने, श्याम काळे, गुरुप्रीत सिंग, नीलेश देशभ्रतार, प्रतीक डोर्लीकर, अमित भालेराव उपस्थित होते.आपल्या उद्घाटनीय भाषणात बोलताना जिग्नेश मेवानी म्हणाले की, येत्या राजस्थान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील किमान एक लाख दलितांना भाजपला मतदान न करण्याची शपथ देणार आहे. हाच प्रयत्न महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात करणार आहे. मोदी सरकारवर टीका करीत ते म्हणाले की, सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता, संविधानाच्या दृष्टीने धोकादायक स्थिती आहे. २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेवर आल्यास लोकशाही अडचणीत येईल आणि पुढे निवडणुका बंद होण्याचा धोका आहे. भाजपाला रोखले गेले नाही तर देशात मनुवाद लागू केला जाण्याचा धोका आहे. अशास्थितीत देशातील सर्वच मुख्य विरोधी पक्ष एकत्र येत असून, ते सकारात्मक चिन्ह आहे. संयुक्त नेतृत्वातील आघाडी पुढे जाईल. कार्यक्रमाचे संचालन क्षितिज गायकवाड यांनी केले.- मोदींचा विकास हे डिझास्टर मॉडेलमोदींचा विकास हे ‘डिझास्टर मॉडेल' आहे. इंधन, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून जनता अडचणीत आहे. रोजगार द्या, जनतेसाठी उपयोगी कामे करा, ते होत नसेल तर गादी रिकामी करा, असे मेवानी म्हणाले. मोदींनी आता दलित मतांचा मुखर्जींनी संघाच्या दुकानाला कुलूप लावावेसंघाच्या कार्यक्रमात जायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रणव मुखर्जी त्यांच्या कार्यक्रमात येतच असतील तर त्यांनी कुलूप सोबत आणून ते संघाच्या दुकानाला ठोकावे, अशी कोटी जिग्नेश मेवानी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. संघाच्या कार्यक्रमाला येऊन उपयोग काय, रोजगार वाढणार नाही, शेतकरी आत्महत्या कमी होणार नाहीत तरीही त्यांच्या कार्यक्रमाला जायचे की नाही, हे ज्याचे त्यांनी ठरवावे. बॅलेटनेच मतदान घ्याईव्हीएमवर जनतेत शंका आहे. मी स्वत: २० हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आलो आहे तरीही ते मशीन असल्याने गडबड करणे शक्य आहे. भाजपा आणि मोदींच्या मनात चोर नसेल तर ईव्हीएमऐवजी बॅलेटने मतदान करून बघावे, त्यात कोणतीही अडचण नाही; शिवाय त्यातून सर्वप्रकारच्या शंकाही दूर होतील, असेही मेवानी म्हणाले.

 

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीnagpurनागपूर