शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, फडणवीसांनी इंदिराजींच्या कार्यक्रमांवर बंदी लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:37 IST

ज्या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवित नाही.

ठळक मुद्देकुमार केतकर यांचा आरोप : यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसायचा आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवित नाही. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर शासकीय कार्यालयांमध्ये इंदिराजींचे कार्यक्रम घेऊ नका, असे आदेशच काढले आहेत. नेहरू, इंदिराला विरोध करणारे हे लोक २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आले तर देशाचा इतिहास बदलतील. देशाला स्वातंत्र्य गांधींनी नव्हे तर गोळवलकर गुरुजींनी मिळवून दिले, असा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकवतील. काँग्रेसमुक्त देश करण्याच्या घोषणा देऊन यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच पुसायचा आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली.धनवटे नॅशनल कॉलेज व राजीव गांधी स्टडी सर्कलतर्फे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. बबनराव तायवाडे होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अनंतराव घारड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शरद वानखेडे, नीलेश कोढे उपस्थित होते. केतकर म्हणाले, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात झालेली सर्व कामे पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिन्यातून एकदा ‘मन की बात’ करून मोठे होण्याचा पंतप्रधान मोदी यांचा भ्रम लवकरच दूर होणार आहे. नेहरू, इंदिरा, राजीव यांना स्वातंत्र्य लढ्याचा व राष्ट्रउभारणीचा एक इतिहास आहे. राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करून हा वारसा संपविण्याचा प्रयत्न होत आहे. जे लोक लष्करी हुकूमशाही मानणारे आहेत, तेच लोक लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत आले असून आता हुकूमशाही लादू पाहत आहेत. अनिवासी भारतीयांनी स्वांतंत्र्याचा लढा समृद्ध केला, हे राहुल गांधी यांनी केलेले विधान बरोबर आहे. आरएसएसची संकल्पनाही एनआरआय कडूनच घेण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.खासदार मोदींच्या दहशतीतमोदींना त्यांच्याच पक्षातील खासदारांचा पाठिंबा नाही. मोदींच्या दहशतीमुळे ते दबून आहेत. खासदार नाना पटोले यांनी ते उघडपणे बोलून दाखविले. यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा हे पक्षातील नेते उघडपणे भूमिका घेऊ लागले आहेत. देश काँग्रेसमुक्त तर होणार नाहीच पण ज्या दिवशी मोदींचे पंतप्रधानपद जाईल त्या दिवशी भाजपाच्या विसर्जनास सुरुवात होईल, अशी टाकी केतकर यांनी केली....तर संघच मोदींना बदलेलइंदिराजींना २८२ जागा मिळाल्या तेव्हा काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती. मोदींना २८२ जागा मिळाल्या तेव्हा भाजपाला ३१ टक्के मते मिळाली आहेत. मोदींच्या भूलथापांमुळे भाजपाला अतिरिक्त १०० जागा मिळाल्या. आता भ्रमनिरास होऊन ही मते माघारी फिरत आहेत. शायनिंग इंडियाच्या वेळी प्रमोद महाजन ३५० जागा जिंकणार असल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात १३८ जागा आल्या. आताही भाजपाची अपेक्षा तेवढीच आहे. मात्र, १८० वर जागा मिळणार नाही. तसे झाले तर संघच मोदींना बदलण्याची मागणी करेल. कारण, नियोजन आयोगाप्रमाणे मोदी रेशीमबागही विसर्जित करून टाकतील, अशी संघाला भीती आहे, असेही केतकर म्हणाले.