शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोदी नावाचा फुगा फुटला  : ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:17 IST

नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच देता येऊ शकतो, असा दावा प्रसिद्ध कवी व राजकीय विश्लेषक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देनव्या पर्यायाच्या शोधात-२०१९

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच देता येऊ शकतो, असा दावा प्रसिद्ध कवी व राजकीय विश्लेषक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे व्यक्त केला.जनमंचतर्फे शनिवारी शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित ‘नव्या पर्यायाच्या शोधात-२०१९ ’या जनसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमंचचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश इटनकर होते. जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.प्रा. ज्ञानेश वाकुडकर म्हणाले, देवेगौडा, व्ही.पी. सिंग किंवा मनमोहन सिंह हे पंतप्रधान होतील, असा विचारही कुणी केला होता का? त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. पर्यायांची कमतरता नाही. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र देशातील या पाच मोठ्या राज्यांमध्ये एकूण २०८ लोकसभेच्या जागा आहेत. यापैकी १९२ जागा या भाजपाकडे आहेत. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. ही बाब भाजपा व आरएसएसचे अनेक नेतेही खासगीत मान्य करतात. यापैकी अर्ध्या जागाही कमी झाल्या तरी भाजपाला रोखणे कठीण नाही, असे गणितही त्यांनी यावेळी मांडले.भाजपासारखे विकृत सरकार पुन्हा या देशात येऊ नये. बँका बुडाल्या, शेतकरी मोडला, शाळा बंद पडताहेत, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप बंद झाल्या आहेत. दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी सारेच त्रस्त आहेत. नोटाबंदी ही या देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. देशद्रोहासारखा तो गुन्हा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.प्रकाश इटनकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर प्रा. शरद पाटील यांनी भूमिका विषद केली. संचालन सुहास खांडेकर यांनी केले.प्रामाणिकपणे काम करणारे राजकारणात यावेराजकारणात चांगली प्रामाणिक माणसं येणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शहरात राहणाऱ्या  मुलांनी पुढे येण्याची गरज आहे. समाजात अनेक चांगली प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहेत. विद्यार्थी, तरुण, शेतकरी, कवी, प्राध्यापक, पत्रकार, विचारवंत, उद्योजक यांच्यामधूनही नवीन पर्याय पुढे येऊ शकतात. या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचेही प्रा. वाकुडकर म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारण