शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 21:11 IST

हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यावर्षी पोलीस बंदोबस्त केला जाणार आहे.

ठळक मुद्देकमी मनुष्यबळात उत्तम सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी केले नियोजन

आॅनलाईन लोकमतनागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यावर्षी पोलीस बंदोबस्त केला जाणार आहे. त्यासाठी अत्यंत सूक्ष्म अभ्यास आणि नियोजन करण्यात आले आहे. म्हणूनच दरवर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तात कमी मनुष्यबळाचा वापर करून चांगली सुरक्षा व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. अधिवेशनाची सुरक्षा व्यवस्था (बंदोबस्त) कसा राहणार, त्यासंबंधाने पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आयुक्त बोलत होते. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि उपायुक्त (प्रशासन) सुहास बावचे उपस्थित होते.आयुक्तांनी यावर्षी हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तात पोलिसांचे संख्याबळ किती, अन्य उपाययोजना कोणत्या त्याची माहिती पत्रकारांना दिली. अधिवेशन काळात विधानभवन, रविभवन, नागभवन, आमदार निवासासह महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सर्वच निवासस्थानी २४ तास विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. अधिवेशन काळात सरकार मुक्कामी असल्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढते. मात्र, त्यात कसलीही हयगय केली जाणार नाही. सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. कायदा तोडण्याचा अथवा हातात घेण्याचा प्रयत्न करणारांवर कडक कारवाई केली जाईल. अनेकदा मोर्चेकरी कायदा हातात घेतात, असा प्रयत्न झाल्यास पोलीस कायदेशीरपणे बळाचा वापर करतील, असा इशाराही त्यांनी दिला.संख्याबळापेक्षा तंत्रज्ञानाला महत्त्वदरवर्षी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात राज्यातील विविध ठिकाणांहून ४ ते ५ हजार पोलीस (अधिकारी-कर्मचारी) बोलवून घेतले जातात. नागपुरातील पोलिसांची संख्याही तेवढीच असते. यावर्षी मात्र एकूण ५,८०० पोलीस अधिकारी-कर्मचारीच बंदोबस्तात राहणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी मनुष्यबळात उत्तम बंदोबस्त करण्याची पोलिसांची योजना आहे. त्यासाठी ड्रोन, सीसीटीव्ही आणि हेल्मेट तसेच बॉडी कॅमेरे, बॅग स्कॅनर यांचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे. त्यासाठी नासुप्र कार्यालयात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लागलेल्या सीसीटीव्हीच्या कंट्रोल रूमजवळच पोलीस आपली स्वतंत्र यंत्रणा उभारून शहरातील प्रत्येक घडामोडीवर, संशयितांवर नजर ठेवणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.२२६ सीसीटीव्ही (स्मार्ट सिटीचे वेगळे)दोन ड्रोन, शंभरावर व्हिडीओ कॅमेरेबाहेरून २७३० पोलीस येणारत्यात ४३० अधिकारी (पोलीस उपनिरीक्षक ते अधीक्षक)बाहेरचे १५ तर शहरातील १२ उपायुक्त१४०० होमगार्ड८ एसआरपीएफ कंपनी, एक फोर्स वन कंपनीशहरातील २ हजार पोलीस२० बॉम्बशोधक आणि नाशक पथकेएकूण मनुष्यबळ ५८००, ३ अ‍ॅम्बुलन्स, अग्निशमन दलाचे बंब, वज्र आणि वरुणही राहणार सज्जमोर्चा पॉर्इंटविविध पक्ष आणि संघटनांच्या मोर्चांसाठी पाच पॉर्इंट ठरवून देण्यात आले आहेत. टेकडी मार्ग, मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, एलआयसी चौक आणि लिबर्टी चौक, असे हे पॉर्इंट आहेत. या ठिकाणांवर बाहेरून अलेल्या पोलिसांना बंदोबस्तासाठी ठेवले जाईल. धरणे, उपोषणकर्त्यांसाठी पटवर्धन ग्राऊंडमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील जागा साफ करण्यात आली असून, आवश्यक त्या सुविधा तेथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.मेट्रो, सिमेंट रोडचे आव्हानमेट्रो आणि सिमेंट रस्त्याच्या कामांमुळे थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. मोर्चेकऱ्यांना हाताळण्यासाठी पोलिसांवरही ताण पडणार आहे. ते एक प्रकारचे आव्हान आहे. मात्र, सर्व व्यवस्थितपणे पार पाडले जाईल. त्यासाठी मेट्रो आणि रस्ता बांधकाम करणाऱ्या वरिष्ठांसोबत आपण चर्चा केली असून, त्यांनी अधिवेशनाच्या कालावधीत दिवसा काम बंद ठेवण्याचे मान्य केले आहे. तरीसुद्धा मोर्चाच्या वेळी वाहतूक रखडण्याचा धोका आहे. त्यासाठी पोलीस उपाययोजना करीत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महामोर्चादरम्यान वाहतूक व्यवस्थेचे तसेच बंदोबस्ताचे वेगळे नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.सभापती व अध्यक्ष रविवारी घेणार तयारीचा आढावाविधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे हिवाळी अधिवेशनासाठी ९ डिसेंबर रोजी विमानाने मुंबई येथून रात्री ८.३० वाजता आगमन होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे १० डिसेंबर रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी ९.५० वाजता येथे येणार आहेत.विधानभवन येथे रविवारी सकाळी ११.३० वाजता हिवाळी अधिवेशन २०१७ च्या अनुषंगाने विधिमंडळ अधिवेशनासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेसंदर्भात तसेच सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि सभापती रामराजे नाईक आढावा घेतील.विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा ९ डिसेंबर रोजी रात्री येणार आहेत. यासोबतच कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर आणि मुख्य सचिव सुमित मल्लिक हेसुद्धा ९ डिसेंबर रोजी येणार आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारPoliceपोलिस